RSS headquarters recce : नागपूरमध्ये संघ मुख्यालयाची रेकी ही गंभीर बाब : फडणवीस

नागपूर
Updated Jan 08, 2022 | 22:57 IST

Nagpur RSS headquarters recce is a serious matter says devendra fadanvis : एखादी व्यक्ती नागपूरमध्ये येऊन संघ मुख्यालय आणि स्मृती भवन परिसराची रेकी करते ही गंभीर बाब आहे. याला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस आणि केंद्रीय यंत्रणेलाही याची माहिती आहे. ते योग्य खबरदारी घेतील; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • नागपूरमध्ये संघ मुख्यालयाची रेकी ही गंभीर बाब : फडणवीस
  • जम्मू काश्मीरमध्ये एका तरुणाला अटक
  • तरुणाने नागपूरमध्ये संघ मुख्यालयाची रेकी केल्याची दिली माहिती

Nagpur RSS headquarters recce is a serious matter says devendra fadanvis : नागपूर : एखादी व्यक्ती नागपूरमध्ये येऊन संघ मुख्यालय आणि स्मृती भवन परिसराची रेकी करते ही गंभीर बाब आहे. याला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस आणि केंद्रीय यंत्रणेलाही याची माहिती आहे. ते योग्य खबरदारी घेतील; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतीय जनता पार्टीचे आमदार आशिष शेलार यांना धमकी देणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे; असेही फडणवीस म्हणाले.

जम्मू काश्मीरमध्ये एका तरुणाला अटक करण्यात आली. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेला हा तरुण काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये येऊन गेला होता. नागपूरमध्ये त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि स्मृती भवन तसेच आणखी काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी (पाहणी) केली होती. अटक करुन चौकशी केल्यावर तरुणाने रेकी केल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच जम्मू काश्मीरच्या सुरक्षा यंत्रणेने नागपूर पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या बंदोबस्तात वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी रेकीच्या मुद्यावर प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना रेकीची बाब गंभीर आणि सुरक्षा यंत्रणा या प्रकरणात योग्य ती कृती करतील; असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईत आमदार आशिष शेलार यांना धमकी देण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत एकाला अटक झाली आहे. शेलारांना आलेल्या धमकीच्या प्रकरणात योग्य ती कारवाई होईल; असाही विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी