Viral Video : व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर नाना पटोले यांची सूचक प्रतिक्रिया 

नागपूर
Updated Jul 21, 2022 | 15:05 IST

Nana Patole on Viral video : चर्चा आणि सफलता ज्या माणसाच्या मागे असते त्याला असे प्रश्नाला सामोरे जावे लागते, काँग्रेस पक्षाचं विधी न्याय विभाग सेल याबाबत सगळी माहिती गोळा करत आहे आणि प्रसंगी आम्ही याबाबत न्यायालयात जाणार, गेल्या वेळेसच प्रकरणही मी विसरलेलो नाही

थोडं पण कामाचं
  • चर्चा आणि सफलता ज्या माणसाच्या मागे असते त्याला असे प्रश्नाला सामोरे जावे लागते,
  • काँग्रेस पक्षाचं विधी न्याय विभाग सेल याबाबत सगळी माहिती गोळा करत आहे
  • प्रसंगी आम्ही याबाबत न्यायालयात जाणार, गेल्या वेळेसच प्रकरणही मी विसरलेलो नाही

Nana Patole , नागपूर : चर्चा आणि सफलता ज्या माणसाच्या मागे असते त्याला असे प्रश्नाला सामोरे जावे लागते, काँग्रेस पक्षाचं विधी न्याय विभाग सेल याबाबत सगळी माहिती गोळा करत आहे आणि प्रसंगी आम्ही याबाबत न्यायालयात जाणार, गेल्या वेळेसच प्रकरणही मी विसरलेलो नाही... माझे पुतळे जाळण्यात आले होते. त्यानंतर जी गोष्ट पुढे आली त्याचे उत्तर मात्र काही मिळालं नाही. माझी बदनामी करणं,  मला त्रास देणे सुरू आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिली आहे. (Nana Patole's suggestive reaction to the viral video)

अधिक वाचा : नरकापेक्षा भयानक जेल

महाराष्ट्रात बहुजनाचा नेतृत्व पुढे येत असताना अशा परीक्षा द्याव्या लागतात. त्यामुळे कोण काय बोलत याबाबत मी काही बोलणार नाही. या सर्व प्रकरणाबाबत काँग्रेसचे विधी सेल  माहिती गोळा करत आहे. मागच्या वेळेस भंडारा जिल्ह्यात झालेल्या घटनेच्या वेळेस सत्य समोर आले, आता त्याचे आरोप करणारे देत नाही आहेत.  त्यामुळे आता माझ्याविरुद्ध  व्यक्तीगत षड्यंत्र करण्यात  लावण्यात येत आहेत,माझा या घटनेशी संबंध नाही. गेल्यावेळेस माझ्या परिवाराला खूप त्रास झाला, असेही नाना पटोले यावेळी म्हणाले. 

अधिक वाचा : ITR भरताना टाळा चुका नाहीतर...

Obc आरक्षणावरून उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी  चिल्लूवर पाण्यात बुडून मेलं पाहिजे असं भाजपाच्या एका नेत्यांनी आज वक्तव्य केले.  त्यावर बांठीया आयोग कोणी बसवला त्यांनी सांगितले पाहिजे की कोर्ट आमचे एकते आहे, असा टोला पटोले यांनी लगावला. 

अधिक वाचा : अचानक बँक बंद झाल्यास...

सोनिया गांधी यांची ईडी चौकशी 

उद्या आमचेही राज्यभर आंदोलन करतोय, सर्वसामान्य लोकांसाठी जीवनावश्यक वस्तूवर gst लावले, आपल्या देशात हिटलरची राजनीती होतेय ? असाही टोला पटोले यांनी लगावला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी