नागपूर : समृद्धी महामार्गासह अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे नागपुरात जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, पंतप्रधानांना पाहून ढोलताशे वाजवणाऱ्यांनाही आनंद झाला. ते जोशात ढोल वाजवू लागले तेव्हा पंतप्रधानांनीही त्याला साथ दिली. पंतप्रधानांचा हा व्हिडिओ पीएमओ ट्विटरवर ट्विट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Narendra Modi played the drum)
पंतप्रधान नरेंद्र मोदी ढोलताशांच्या मध्ये पोहोचले आणि त्यांनी स्वतः ढोल वाजवला. यावेळी त्यांनी ढोल-ताशांच्या तालावर ताल मिसळला. पंतप्रधान ढोल वाजवतानाचा १२ सेकंदांचा व्हिडिओही बनवण्यात आला होता, जो पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे, हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोक पंतप्रधानांच्या या व्हिडिओला लाईक करण्यासोबतच आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.