Makar Sankranti kite flying : नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुलांसोबत उडवले पतंग

नागपूर
Updated Jan 14, 2022 | 22:38 IST

Navneet Rana and Ravi Rana flew kites with children : अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांनी स्वतः हवेत पतंग उडवून पतंगबाजीचा आनंद घेतला.

थोडं पण कामाचं
  • नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुलांसोबत उडवले पतंग
  • अमरावतीत २ हजार मुलांना वाटले पतंग
  • मुलांसोबत नवनीत राणा आणि रवी राणा यांनी स्वतः हवेत पतंग उडवून पतंगबाजीचा आनंद घेतला

Navneet Rana and Ravi Rana flew kites with children : अमरावती : युवा स्वाभिमान संघटनेचे वतीने दरवर्षी पतंग महोत्सव उत्साहाने साजरा केला जातो. या पतंग महोत्सवात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा पतंगबाजी करतात. यंदा अमरावतीत राणा दाम्पत्याने २००० मुलांना पतंग वाटप केले. या पतंगांवर विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या लिहिल्या होत्या. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी स्वतः हवेत पतंग उडवून पतंगबाजीचा आनंद घेतला.

पतंग महोत्सव नवनीत राणा व रवी राणा यांनी संक्रांतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वप्रथम तीळ गूळ देऊन विदर्भ व अमरावती बद्दल गोड गोड बोला व लवकर विदर्भात या अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली.

विदर्भातील समस्यांचा उल्लेख असलेले खास पतंग उडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊ दे. आता याच पद्धतीने त्यांना विदर्भातील समस्या कळू द्या अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. पतंग महोत्सव अधिक बहारदार झाला तो नवनीत राणा यांनी घेतलेल्या उखाण्यामुळे....

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी