आता केवळ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र आणि महाराष्ट्रात सरकार येईल- बावनकुळे

नागपूर
Updated Sep 29, 2022 | 19:50 IST

BJP: आता केवळ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र आणि महाराष्ट्रात सरकार येईल अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

अमरावती: 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना आजही शरद पवारांचा आधार घ्यावा लागतो, त्या शरद पवार यांच्या नावावर कितीदा निवडून येतील आता फक्त मोदींच्या नावावरच लोक निवडून येणार व मोदींच्या नावावरच सरकार येतील.' अशी बोचरी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

'बारामती मतदारसंघात पाच मतदारसंघ येतात ते मतदारसंघ विकासापासून आजही वंचित आहे. पवार कुटुंबाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आता तर एकविसाव्या शतक आहे त्यामुळे आगामी काळात बारामतीला झटका बसेल.' असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी