'हे' सांगायला शरद पवार विसरले : देवेंद्र फडणवीस

नागपूर
Updated Mar 21, 2021 | 15:46 IST

Devendra Fadnavis: शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल भाष्य केलं. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत.

नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे असून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. परमबीर सिंग यांचे आरोप गंभीर आहेत, या प्रकऱणाच्या चौकशीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत आणि अनिल देशमुख यांच्याबाबत उद्यापर्यंत निर्णय घेण्यात येईल असं शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (Parambir Singh letter case Maharashtra former cm Devendra Fadnavis attack Sharad Pawar demands resignation of Anil Deshmukh)

हे सांगायला शरद पवार विसरले

सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंग यांचाच असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, परमबीर सिंग यांच्याच कमिटीने सचिन वाझे यांना नोकरीत घेतले. पण, मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या निर्देशाने, आशीर्वादाने त्यांनी हे काम केले, हे सांगायला शरद पवार विसरले.

गृहखाते कोण चालवते?

गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्यशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं सभागृहात अनिल परब देतात. या नियुक्तांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वाझे ज्या गाड्या वापरत होते त्यापैकी काही गाड्या कोण वापरत होते?

सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झालं पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

 1. सरकारचे कसे आहे... आम्ही भ्रष्टाचार करू, दुराचार करू, अनाचार करू. फक्त विरोधक बोलले की, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू. आता अशा वाक्यांची आम्हाला सवय झालीय, त्याने फार काही परक पडत नाही. 
 2. अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाच पाहिजे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही.
 3. ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. ते केवळ परमबीर सिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा? थोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी १५-२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी करावी असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का?
 4. ही दलाली आणि लाचखोरी तेव्हाच थांबवली गेली असती तर आज हा प्रसंग आला नसता. माझ्या माहितीप्रमाणे या दलालीचा संपूर्ण रिपोर्ट सरकारच्या रेकॉर्डवर इनवर्ड झालेला आहे.
 5. सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झालं पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे. 
 6. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्यशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं सभागृहात अनिल परब देतात. या नियुक्तांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे. 
 7. परमबीर सिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार असाल तर ते पापांवर पांघरूण घालण्यासारखे आहे 
 8. परमबीर सिंग यांच्या पत्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना माहिती दिल्याचे सांगितले आहे. मग मुख्यमंत्री का बोलत नाहीत?
 9. परमबीर सिंग यांच्याच कमिटीने वाझे यांना नोकरीत घेतले. पण, मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या निर्देशाने, आशीर्वादाने त्यांनी हे काम केले, हे सांगायला शरद पवार विसरले.
 10. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अधीन राहून काही फोन सर्व्हिलन्सवर होते. त्यातून जितके गंभीर प्रकार पुढे आले ते फारच गंभीर आहेत. बदल्यांचे एक मोठे रॅकेट आढळून आले. सुबोध जयस्वाल यांची तर बदली होणार नव्हती, ते कंटाळून सोडून गेले.
 11. तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलीस महासंचालकसारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे कारणच हे होते, कारण भ्रष्टाचाराबाबत शासन गंभीर नव्हते. 
 12. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल एक पत्र लिहिले आहे. पण अशाप्रकारचे हे पहिले पत्र नाही. यापूर्वी तत्कालिन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी