VIDEO: सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

नागपूर
Updated May 16, 2019 | 21:08 IST | Times Now

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे हा अपघात झाला आहे.

rss chief mohan bhagwat convoy car accident in chandrapur
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात  |  फोटो सौजन्य: Times Now

चंद्रपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला गुरुवारी संध्याकाळी अपघात झाला. चंद्रपूर येथे हा अपघात झाला असून या अपघातात मोहन भागवत यांचे चार सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. तर, सरसंघचालक मोहन भागवत हे सुखरुप आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चंद्रपुरातील नांदुरी गावाजवळ मोहन भागवत यांच्या ताफ्यासमोर अचानक गाय आली. यावेळी ताफ्यातील एका गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी पलटी झाली. नागपूरला परतत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात चार सुरक्षारक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजीव तुली यांनी सांगितले की, मोहन भागवत अगदी सुरक्षित आणि सुखरुप आहेत. यापूर्वी ६ ऑक्टोबर २०१७ रोजी अशाच प्रकारे एका अपघातात मोहन भागवत थोडक्यात बचावले होते. उत्तरप्रदेशातील मथुरा येथे यमुना एक्सप्रेस वेवर त्यांच्या गाडीची दुसऱ्या गाडीसोबत धडक झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात Description: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे हा अपघात झाला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
आंबेनळी घाटातील बस अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकऱ्या 
आंबेनळी घाटातील बस अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मिळणार नोकऱ्या 
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?
राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानं नाराज मनसे कार्यकर्त्यांनं स्वत: ला पेटवून घेतलं
राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानं नाराज मनसे कार्यकर्त्यांनं स्वत: ला पेटवून घेतलं
 राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर पहिल्यांदा बोलले उद्धव ठाकरे 
 राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर पहिल्यांदा बोलले उद्धव ठाकरे 
[VIDEO]: पुण्यातील धक्कादायक घटना, रस्त्यावर पार्क केलेल्या कारला दुसऱ्या कारची जोरदार धडक
[VIDEO]: पुण्यातील धक्कादायक घटना, रस्त्यावर पार्क केलेल्या कारला दुसऱ्या कारची जोरदार धडक
 येत्या १० दिवसात भाजपसोबत राहायचे की नाही हे ठरवणार : नारायण राणे 
 येत्या १० दिवसात भाजपसोबत राहायचे की नाही हे ठरवणार : नारायण राणे 
LIVE: ईडीच्या कार्यालयात सलग साडे चार तास राज ठाकरेंची चौकशी
LIVE: ईडीच्या कार्यालयात सलग साडे चार तास राज ठाकरेंची चौकशी
राज ठाकरेंनी काही चुकीच केले नसेल तर घाबरायची गरज नाही : भाजपा मंत्री राम शिंदे 
राज ठाकरेंनी काही चुकीच केले नसेल तर घाबरायची गरज नाही : भाजपा मंत्री राम शिंदे