"वाझे काय-काय बोलणार, यामुळे त्यांचे सारेच मालक अस्वस्थ"

नागपूर
Updated Mar 27, 2021 | 20:10 IST

Devendra Fadnavis: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्राची सर्वाधिक बदनामी वाझे प्रकरणामुळे झाली - देवेंद्र फडणवीस
  • पोलीस बदल्यांच्या रॅकेटचा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे गेल्याने सारेच घाबरले - देवेंद्र फडणवीस
  • चिंता करू नका, एनआयएच्या चौकशीत सारे काही स्पष्ट होणार - देवेंद्र फडणवीस

नागपूर : मुंबईत स्कॉर्पिओत आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात एनआयएने सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आहे. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच विरोधकांकडून राज्य सरकारवर प्रश्नांचा भडीमार करत घेरण्याची एकही संधी सोडत नाही. आता पुन्हा एकदा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सचिन वाझे प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) हल्लाबोल केला आहे.

वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राची सर्वाधिक बदनामी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणामुळे झाली आहे. तेवढी दुसरी कुठल्या प्रकरणामुळे झालेली नाहीये. मला माहिती आहे की, नवाब मलिक का चिंतेत आहेत. कारण, त्यांना माहिती आहे फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे त्यामुळे अनेक लोकांचं बिंग फुटत आहे. मी त्या दिवशी सुद्दा सांगितलं, महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा जो काही प्रकार आहे, हा अहवाल खरं तर नवाब मलिकांनीच फोडला आहे."

खऱ्या अर्थाने हे जे काही वाझेंचे मालक आहेत ते आज चिंतेत आहेत. पोलिसांचे जे सीसीटीव्ही आहेत त्याचा डीव्हीआर कुणीही गायब केला तरीही त्याचा संपूर्ण बॅकअप हा मेन सर्वरला आहे त्यामुळे त्याचं कुठलंही फूटेज गायब होऊच शकत नाही. प्रायव्हेट डीव्हीआर एखादा नष्ट करणं सोपं आहे. पण मुंबई पोलिसांचे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्याचं डिजिटल फूटप्रिंट अशा प्रकारे स्टोअर केलं जातं जे कुणीही एक माणूस त्या ठिकाणी नष्ट करुच शकत नाही असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

...म्हणून महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांत अस्वस्थता

एनआयएची चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीत काय बाहेर येईल हे माहिती नसल्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत अस्वस्थता आहे. कारण वाझेचे खरे मालक हेच आहेत. आपल्या माणसाकडून काय-काय कामं यांनी करुन घेतली आहेत हे केवळ यांनाच माहिती आहे. ते बाहेर येतील का? अशा प्रकारच्या भीतीमुळे आता या शंका सुरू आहेत. एनआयए या प्रकरणी चौकशी करत आहे सर्व गोष्टी नीट बाहेर येतील अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी