शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी उडवली Aaditya Thackeray यांची खिल्ली, पाहा VIDEO

नागपूर
Updated Jul 05, 2022 | 15:13 IST

Maharashtra News: महाराष्ट्र्रात सत्तांतरानंतर शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार आपल्या मतदारसंघात परतत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी मतदारसंघात आल्यावर पत्रकार परिषद घेतली. 

थोडं पण कामाचं
  • शिवसेनेच्या बंडखोर आमदाराने उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली
  • भर पत्रकार परिषदेत आमदार संजय गायकवाड यांची आदित्य ठाकरेंवर टिप्पणी

बुलढाणा : शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने मविआ सरकार कोसळले. त्यानंतर आता राज्यात एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde group) आणि भाजपचं सरकार आलं आहे. एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले सर्व बंडखोर आमदार (Shiv Sena Rebel MLA) आता आपल्या मतदारसंघात परतत आहेत. मतदारसंघात परतल्यावर बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी एक पत्रकार परिषद घेतली.

आदित्य ठाकरेंची उडवली खिल्ली

यावेळी पत्रकारांनी त्यांना आदित्य ठाकरे संदर्भात प्रश्न विचारला असता, बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडविली. गायकवाड म्हणाले की, आदित्य ने कधीच कोणत्याही आमदाराला नमस्कार केलाच नाही आणि त्याचे डोळे दिसतील तर ते डोळ्यात डोळे घालतील.

हे पण वाचा : काँग्रेस आमदाराच्या गेस्ट हाऊसवर ACB ची धाड, पाच ठिकाणी झाडाझडती

राऊत शिवसेना संपवालया निघाले 

शिवसेनेतील बंड पाहून खासदार संजय राऊत यांनी यातील आमदारांना कुणाला डुक्कर म्हटलं, कुणाला रेडा म्हटलं, तर काही महिला आमदारांना वेश्या म्हटलं. काहींचे बाप काढले तसे आम्हीही त्यांचे बाप काढू शकतो आम्ही 42 आमदारांनी संजय राऊत यांना मतदान केलं, त्यामुळे त्यांनी सांगाव आता हे 42 आमदार त्यांचे बाप आहेत का? त्यामुळे त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर बोलावं अशी सडसडून टीका आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. तर संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

आमच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो असणारच 

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावता येणार नाही असं शिवसेनेचे नेते म्हणत आहेत. पण प्रबोधनकार ठाकरे यांनी 1966 ला शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी जाहीर पणे सांगितले होते की, हा माझा बाळ मी माझ्या राष्ट्राला अर्पण करत आहे. बाळासाहेब ठाकरे हे देशातील 32 राष्ट्रपुरुषांपैकी एक राष्ट्रपुरुष आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुष कोणाच्या बापाचा नसतो. तो देशाचा असतो, त्यामुळे आमच्या बॅनर तसेच जे काही कार्यक्रम असतील त्याच्यावर बाळासाहेबांचा फोटो असणार म्हणजे असणार. त्याला आम्ही कोणी अडवू शकणार नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे गटातील बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलडाणा येथील त्यांच्या मातोश्री कार्यालयावर पत्रकार परिषदेत दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी