Sudhir Mungantiwar, चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेनेच्या दोन गटातील खटल्याची सुनावणी आता सोमवार पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पक्षाचा विचार पुढे नेणा-यालाच कार्यकर्त्यांचे समर्थन नसेल असे सांगत ओठात- पोटात व कणाकणात हिंदुत्व असलेल्या नेत्याला न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली. (Some people think that the political party is owned by their family say Sudhir Mungantiwar)
अधिक वाचा : अफगाणी धर्मगुरू हत्या प्रकरणातील आरोपींच्या आवळल्या मुसक्या
सर्वोच्च न्यायालयाने तर्काच्या आधारे निर्णय घ्यावा. हवा तेवढा वेळ घेऊन एकदाची याबाबत स्पष्टता करावी असेही मुनगंटीवार म्हणाले.
काही पक्ष म्हणजे कुटुंबविस्तार असल्याचे सांगत या कौटुंबिक पक्षांना कार्यकर्ते कंटाळले असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या जी-23 असंतुष्ट गटाबाबतही त्यांनी अशीच भूमिका मांडली होती याची आठवणही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी करून दिली.
अधिक वाचा : होंडा आणतेय नवी एसयूव्ही 'एन7एक्स', जबरदस्त लूक, वैशिष्ट्ये