Devendra Fadnavis: 'तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला', फडणवीसांचा थेट आरोप..

नागपूर
Updated Sep 22, 2022 | 15:12 IST

Devendra Fadnavis Nagpur: महाविकास आघाडी एकत्रितपणे मला संपवण्याचा प्रयत्न केला. असा थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना केला आहे.

Devendra Fadnavis नागपूर: 'तुम्ही 2019 ला देखील माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रितपणे त्यांनी अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण ते यापुढेही मला संपवू शकणार नाही.' असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते नागपूरमध्ये बोलत होते. 

पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:

सध्या देशभरात जी छापेमारी NIA कडून सुरू आहे त्या संदर्भात लवकरच माहिती जाहीर केली जाईल. पण सध्या तरी असं दिसतंय की संपूर्ण cordonated पद्धतीने ही छापेमारी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण म्हणजे निराशेचं उदाहरण होतं. माझा सवाल त्यांना असा आहे की, आम्ही कायदेशीरपणे जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो होतो. पण ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन पाठीत खंजीर तुम्ही खुपसला होता, त्यावेळी तुम्ही राजीनामा का दिला नाही. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन निवडणुका का लढवल्या नाही. 

तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता, मोदीजींचा फोटो दाखवून निवडून आला होता, त्यामुळे तेव्हाच राजीनामे देऊन निवडून यायचं होतं. ते असे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची ही शेवटची निवडणूक आहे, पण मी त्यांना एकच सांगू शकतो, 'मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है. 'तुम्ही 2019 ला देखील माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रितपणे त्यांनी अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण ते यापुढेही मला संपवू शकणार नाही.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी