Farm Law : पुन्हा कृषी कायदे आणणार, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले संकेत

नागपूर
Updated Dec 25, 2021 | 19:34 IST

union famer minister narendra singh tomar hint to bring back farm law केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वीच तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत. संसदेत त्यावर कार्यवाही झाल्यानंतर शेतकर्‍यांनीही आपले आंदोलन मागे घेतले आणि आपल्या घरी परतले.

थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वीच तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत.
  • संसदेत त्यावर कार्यवाही झाल्यानंतर शेतकर्‍यांनीही आपले आंदोलन मागे घेतले
  • आता केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी हे कायदे परत आणण्याचे संकेत दिले आहे.

Farm Law :  नागपूर : केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वीच तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत. संसदेत त्यावर कार्यवाही झाल्यानंतर शेतकर्‍यांनीही आपले आंदोलन मागे घेतले आणि आपल्या घरी परतले. परंतु आता केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी हे कायदे परत आणण्याचे संकेत दिले आहे. नागपूरमध्ये बोलताना त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.  (union famer minister narendra singh tomar hint to bring back farm law)

नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना तोमर म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी तीन कृषी कायदे आणले होते.  गेल्या ७० वर्षात शेतकर्‍यांसाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केलेले सर्वात मोठे बदल होते. परंतु अनेक शेतकर्‍यांना हे कायदे आवडले नाहीत, त्यामुळे आम्ही एक पाऊल मागे घेतले आहे वेळ आल्यास आम्ही पुन्हा पुढे येऊ. शेतकरी हे या देशाचा कणा आहेत, जर शेतकरी मजबूत झाला तर देश मजबूत होईल असेही तोमर यावेळी म्धणाले. 

केंद्र सरकारने संयुक्त किसन मोर्चाला कृषी कायदे मागे घेणे आणि शेतकर्‍यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच शेतकर्‍यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. आंदोलनात ७०० शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. या मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यावर अजून चर्चा सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी