Nagpur : आव्हाडांचा राजीनामा मंजूर होणार नाय, विधानसभा अध्यक्षांनीच सांगितलं नेमकं कारण

नागपूर
Updated Nov 15, 2022 | 16:29 IST

rahul narvekar : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाडांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे.

थोडं पण कामाचं
  • जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची चर्चा
  • विधानसभा अध्यक्षांच्या नावे पत्र

नागपूर : ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी 72 तासात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर माझ्यावर लावलेले आरोप आणि गुन्हे खोटे आहेत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाडांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. (Will you accept Ahwada's resignation?, Rahul Narvekar said..)

अधिक वाचा : Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, काय झाली चर्चा?

विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे व्यतित झालेल्या आव्हाडांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार प्रयत्न केले. मात्र, आव्हाड आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावे पत्र दिले आहे. हिवाळी अधिवेशनाचा आढावा घेण्यासाठी नागपूरात आलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

अधिक वाचा : आमदारकीचा राजीनामा देतो, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट

नार्वेकर म्हणाले, आतापर्यंत माझ्याकडे जितेंद्र आव्हाड किंवा इतर कोणत्याही विधिमंडळ सदस्याचा राजीनामा आलेला नाही. एखाद्या आमादाराला राजीनामा द्यायचा असेल तर तो विधिमंडळ अध्यक्षांना दिला जातो. ते मागील १५ ते २० वर्षे विधिमंडळात काम करत आहेत. त्यामुळे राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे द्यायचा, याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे. राजीनामा स्वीकारण्यापूर्वी पडताळणी करावी लागते. राजीनामा देण्याची कार्यपद्धती, नियम असतात. या सर्वांचे पालन झाले आहे का? हे पाहावे लागते. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर राजीनामा स्वीकारायचा की नाही, हे ठरवले जाते, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी