महाराष्ट्र: पोलीस अकादमीत २२ प्रशिक्षणार्थी पोलिसांना कोरोना

नाशिक
रोहन जुवेकर
Updated Nov 14, 2021 | 15:05 IST

22 cadets of Maharashtra Police Academy corona positive कोरोना संकटाचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र पोलीस अकादमीला बसला आहे. अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या २२ पोलिसांना कोरोना झाला आहे.

22 cadets of Maharashtra Police Academy corona positive
महाराष्ट्र: पोलीस अकादमीत २२ प्रशिक्षणार्थी पोलिसांना कोरोना 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र: पोलीस अकादमीत २२ प्रशिक्षणार्थी पोलिसांना कोरोना
  • फक्त दोन दिवसांत अकादमीत २२ प्रशिक्षणार्थी पोलिसांना कोरोना
  • ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल त्यांनाच अकादमीत प्रवेश मिळेल - अकादमी प्रशासन

22 cadets of Maharashtra Police Academy corona positive । नाशिक: कोरोना संकटाचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र पोलीस अकादमीला बसला आहे. अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या २२ पोलिसांना कोरोना झाला आहे. फक्त दोन दिवसांत अकादमीत २२ प्रशिक्षणार्थी पोलिसांना कोरोना झाल्याचे आढळले. सर्व कोरोनाबाधीत प्रशिक्षणार्थी पोलिसांना नाशिक महानगरपालिका संचालित बिटको रुग्णालयात दाखल केले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी निमित्त प्रशिक्षणार्थी पोलिसांना सुटी देण्यात आली होती. गावी गेलेले प्रशिक्षणार्थी सात दिवसांची सुटी संपताच परतले. सुटीच्या काळात गावी गेलेल्यांना अकादमीत चार दिवस क्वारंटाइन केले होते. क्वारंटाइनची मुदत संपताच कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यावेळी २२ जणांना कोरोना झाल्याचे लक्षात आले.

राज्यात कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. पण पोलीस अकादमीत अचानक कोरोनाचा स्फोट झाला आहे. फक्त दोन दिवसांत कोरोनाचे २२ रुग्ण आढळल्यामुळे अकादमीत कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल त्यांनाच अकादमीत प्रवेश मिळेल, असे पोलीस अकादमीच्या प्रशासनाने सांगितले. अकादमीत आधीपासूनच असलेल्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवले जात आहे, असेही प्रशासनाने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी