चार लेकरांच्या मम्मीचं 20 वर्ष लहान मुलासोबत प्रेमाचं चक्कर, या गोष्टीच्या हट्टामुळे तरुणाचा गेला जीव

नाशिक
भरत जाधव
Updated Mar 01, 2022 | 22:44 IST

नाशिक शहरातील अडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. येथील एका महिलेनं आपल्या वयापेक्षा 20 वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणासोबत लग्न करण्यासाठी सर्व हद्द पार केली.

45 year old women  love affair with 20-year-old boy
45 वर्षीय महिलेच्या 'या' हट्टापायी 25 तरुणांचा गेला जीव  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • संबंधित तरुणानं आपल्याशीच लग्न करावं म्हणून आरोपी महिलेनं त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केला
  • पोलिसांनी एक महिलेसह दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला

नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील अडगाव पोलीस ठाण्याच्या (Adgaon Police Station) हद्दीत एक वेड्या प्रेमाच्या अंताची घटना उघडकीस आली आहे. येथील एका महिलेनं (Woman) आपल्या वयापेक्षा 20 वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणासोबत लग्न करण्यासाठी सर्व हद्द पार केली. तरुणाने आपल्याशी लग्न करावं असा हट्ट एका चार मुलांच्या आईनं केला. संबंधित तरुणानं आपल्याशीच लग्न करावं म्हणून आरोपी महिलेनं त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ (Physical and mental torture) केला आहे. या छळाला छळाला कंटाळून अखेर संबंधित तरुणानं आरोपी महिलेच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी एक महिलेसह दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास अडगाव पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश रवींद्र मोरे असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचं नाव असून तो भुसावळ येथील रहिवासी आहे. मागील एक वर्षांपासून रमेशचं नाशकातील एका 45 वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. मृत रमेश आरोपी महिला एकमेंकाच्या प्रेमात खूप आंधळे झाले होते. मृत तरुण हा आरोपी महिलेच्या घरी राहू लागला होता. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिलेला चार मुलं आहेत. असं असूनही आरोपी महिला 25 वर्षीय रमेशवर लग्नासाठी दबाव टाकत होती.

रमेशनं गावाकडे जाऊन अन्य कुणाशी लग्न करू नये, असं तिला वाटत होतं. त्यामुळे ती रमेशला मानसीक आणि शारीरिक त्रास देऊ लागली. आरोपी महिलेच्या छळाला कंटाळून अखेर रमेशनं आपल्या प्रेयसीच्या घरात म्हणजेच चार मुलांची आई असलेल्या महिलेच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आरोपी महिलेनं पुरावा नष्ट करण्यासाठी आपला मुलगा आणि अन्य एका तरुणाच्या मदतीने रमेशचा मृतदेह महामार्गावर टाकून दिला. तसेच रमेशचा अपघातात मृत्यू झाल्याचं भासवलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
पण शवविच्छेदन अहवालामुळे रमेशचा मृत्यूचं गूढ उलगडलं आहे.

शवविच्छेदन अहवालात रमेशनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं. त्या अनुषंगाने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर, रमेश हा भुसावळ येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृताच्या घरी जाऊन तपास केला असता तो ओझर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. तसेच मागील एका वर्षापासून त्याचं एका महिलेशी प्रेमसंबंध सुरू असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी