मुंबई : मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक-मुंबई प्रचंड खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या नादरुस्त रस्त्यांमुळे वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. एरवी नाशिक- मुंबई प्रवास तीन तासांच असताना या खड्ड्यांमुळे सहा तासांपेक्षा अधिक वेळ लागत होता. पण आता नाशिक-मुंबई दरम्यान गोंदे ते पिंप्रीसदो या २० किलोमीटरचे सहापदरीकरणाला मंजुरी मिळवली असून त्यासाठी ७०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकरांना आता अवघ्या अडीच तासांतच मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे. (700 crore approved for six-lane Mumbai-Nashik highway)
अधिक वाचा : Shivpratap Din : अवघा प्रतापगड झाला शिवमय ; शिवप्रताप दिनी जल्लोषाचे वातावरण
शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले की, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नाशिक ते मुंबई दरम्यानच्या मार्गावरील गोंदे ते पिंप्रीसदो या २० किलोमीटर मार्गाचे सहापदरीकरण मंजुरी मिळाली आहे. या सहापदरी करणासाठी ७०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जात असताना मुंबई- आग्रा महामार्गाला पिंप्रीसदो येथे अगदी जवळून जातो. यामुळे मुंबई आग्रा महामार्गावरून समृद्धीवर जाण्यासाठी येथून जवळचा पर्याय असणार आहे. यामुळे या भागात मुंबई आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण करण्यात येणार आहे. १८ डिसेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सहापदरी मार्गाचे भूमीपूजन होणारी असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.