Fire Breaks Out at Jindal Company Nashik | जिंदाल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट, नेमकं काय झालं?, पहा Video

Nashik Jindal Company Blast | जिंदाल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असून धुराचे लोट आजूबाजूच्या कपन्यांमध्ये पसरले आहेत. अग्निशमन विभागाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करतांना पाहायला मिळते.

A huge fire broke out in a company in Nashik
Nashik | जिंदाल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जिंदाल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली
  • धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरांमध्ये पसरले
  • आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर गोंदे गावाजवळ असलेल्या जिंदाल कंपनीमध्ये बाॅयलरचा स्फोट झाला आहे. आतापर्यंत १४ जण जखमी झाले असून अडकलेल्या दोन कामगारांची सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन विभागाच्या ३ ते ४ गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या असून अग्निशमन कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. (A huge fire broke out in a company in Nashik)

अधिक वाचा : नारायण राणेंनी राज ठाकरेंची तर जोगेंद्र कवाडेंनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण

जिंदाल कंपनीमध्ये सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास लागली होती. जेव्हा ही आग लागली तेव्हा सुरुवातीस कमी प्रमाणात होती. परंतु, अचानक या आगीने रौद्र रूप घेतले. ही आग मोठी होऊन काळ्या धुराचे लोट बाहेर येऊ लागले.  आग लागलेल्या जिंदाल कंपनीत काही कामगार देखील अडकले असल्याचे समजते. या आगीत काही कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

अधिक वाचा : Railway Megablock : रेल्वे प्रवासाला निघण्याआधी हे वाचा, आज नव्या वर्षातला पहिला मेगाब्लॉक

जिंदाल कंपनीत आत्तापर्यंत 14 जखमी तर चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे.  परंतु यात कंपनीच्या मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. याशिवाय पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी