accident: धुळे सुरत एसटी बसचा अपघात; कोंडाईबारी घाटात दोन ट्रकमध्ये अडकली बस

नाशिक
भरत जाधव
Updated Apr 16, 2023 | 21:47 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा धुळे सुरत महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट पूर्ण झाली आहेत.  तर काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याने अपघात घडत आहेत. 

Dhule Surat ST Bus Accident
बसचा अपघात; कोंडाईबारी घाटात दोन ट्रकमध्ये अडकली बस   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा धुळे सुरत महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.
  • एसटी बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते. त्यापैकी सात प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत.
  • जखमींना खासगी आणि 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

नंदूरबार : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा धुळे सुरत महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट पूर्ण झाली आहेत.  तर काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याने अपघात घडत आहेत. 

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेल्या कोंडाईबारी घाटात उतारावर एकेरी वाहतूक असल्यामुळे या ठिकाणी दोन ट्रकमध्ये धुळे-सुरत एसटी बस अडकल्याने  अपघात झाला. दोन्ही बाजूंनी धडक बसल्याने एसटी बसचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. एसटी बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते. त्यापैकी सात प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. इतर प्रवाशांना मुक्का मार लागला आहे. 

अधिक वाचा  :  Horoscope : भोलेनाथाचा दिवस 'या' राशींसाठी अपेक्षीत लाभाचा

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना खासगी आणि 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तर अती गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

अधिक वाचा  :  Viral Video खाटेवरील घोडीवर स्वार नवरदेवाची अजब मिरवणूक

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नागपूर धुळे सुरत यावर गेल्या आठ ते दहा वर्षापासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. अनियोजित कामामुळेच अपघातांची संख्या वाढत आहे. यावर प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी