नाशिक हादरलं! अफगाणी तरुणाची हत्या, समोर आलं धक्कादायक वास्तव, मृत तरुण स्वतःला मुस्लिम धर्माच्या धर्मगुरूंचा अवतार असल्याचही सांगायचा

The shocking reality of the murder of an Afghan youth : मृत चिश्ती यांचा मित्र गफार आणि आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या दोघांची कसून चौकशी पोलीस करत आहेत. त्याचबरोबर, पोलिसांना घटनास्थळी एका भूखंडावर नारळ फोडून, अगरबत्ती लावून, कुंकू डबी मिळून आली आहे. यावरून अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला का? याचाही शोध पोलिस घेत आहेत

The shocking reality of the murder of an Afghan youth
अफगाणी तरुणाची हत्या, समोर आलं धक्कादायक वास्तव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • येवल्यात अफगाणी सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्तीची हत्या करण्यात आली आहे
  • जरीब चिश्तीच्या डोक्यात गोळी झाडून ही हत्या करण्यात आली
  • पोलिसांनी सदर हत्येप्रकरणी अद्याप दोघांना अटक केली आहे

Afghan Citizen Murderd : नाशिक : येवल्यात अफगाणी सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्तीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सदर सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्तीच्या हत्येने नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जरीब चिश्तीच्या हत्येप्रकरणी दोघाना अटक केली आहे. पोलीसांच्या म्हणण्यानुसार चीश्तीची हत्या मालमत्तेच्या वादातून झाल्याची माहिती मिळाली आहे. येवला तालुक्यातील नियोजित चिचोंडी एमआयडीसी परिसरात मंगळवारी रात्री आठवाजेच्या सुमारास सदर सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी काही तासांत हत्येचा छडा लावला आहे. (aghanistan citizen murder in Nashik two arrested)

अधिक वाचा ; शिंदे-पवारांची खरंच भेट झाली?जाणून घ्या VIRALफोटो मागचं सत्य

जरीब चिश्तीच्या डोक्यात गोळी झाडून ही हत्या करण्यात आली

नाशिकचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सदर हत्येच्या संदर्भातील माहिती आज पत्रकारांना दिली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले की, सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती हा अफगाणी युवक सुमारे ३५ वर्षीचा आहे. आरोपीने जरीब चिश्ती यांच्या डोक्यात गोळी झाडून ही हत्या केली आहे. आरोपीने एकाच गोळीत चिश्ती यांची हत्या केली असून, हत्या करणारा आरोपी हा सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांचा ड्राइव्हरचं असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केला आहे.

अधिक वाचा ; युकेचा फ्री व्हिसा आणि नोकरी देण्याचा मेसेज! म्हणजे फसवणूक

पोलिसांनी सदर हत्येप्रकरणी अद्याप दोघांना अटक केली आहे

दरम्यान, पोलिसांनी सदर घटनेचा तपास तत्काळ सुरु केला होता. पहाटे दीड वाजता फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच  मृत चिश्ती यांचा मित्र गफार आणि आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या दोघांची कसून चौकशी पोलीस करत आहेत. त्याचबरोबर, पोलिसांना घटनास्थळी एका भूखंडावर नारळ फोडून, अगरबत्ती लावून, कुंकू डबी मिळून आली आहे. यावरून अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला का? याचाही शोध पोलिस घेत आहेत. मृत चिश्ती यांचे यूट्यूब चॅनेल हे उत्पन्नाचे मोठे स्त्रोत होते. अशी देखील माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा : घरात आर्टिफिशियल फूल ठेवणे योग्य असते का? जाणून घ्या 

चिश्ती स्वतःला तो मुस्लिम धर्माच्या धर्मगुरूंचा अवतार सांगत असल्याची माहिती

मृत सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांची मालमत्ता ही मोठ्या प्रमाणात होती अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्याचबरोबर, वावी परिसरात ५ एकर जमीन दुसऱ्याच्या नावावर घेतली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. चिश्ती यांच्या आणखी काही मालमता देखील असल्याचं बोललं जाऊ लागले आहे. चिश्ती स्वतःला मुस्लिम धर्माच्या धर्मगुरूंचा अवतार देखील सांगत असल्याचं समोर आले आहे. ते मुळचे अफगाणिस्तान येथील होते. भारतात ते काही वर्षांपासून वावीत विस्थपित म्हणून राहत होता. या वर्षाच्या शेवटी त्याची मुदत संपणार होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी