Nashik Accident : सिन्नर येथे पुन्हा भीषण अपघात; कारच्या टायरने घेतला 5 विद्यार्थ्यांचा जीव

नाशिक
भरत जाधव
Updated Dec 10, 2022 | 10:43 IST

नाशिक येथील कॉलेजात शिकणारे विद्यार्थी स्विफ्ट (Swift) कारने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. संगमनेरहून लग्न सोहळा पार पाडून ते परतत होते. शुक्रवारी संध्याकाळ स्विफ्ट कार मोहदरी घाटावर आली. त्याच वेळेस कारचा टायर फुटल्याने कार लेन ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वाहनांवर आदळली.

Another terrible accident at Sinnar; Car tires brust killed 5 students
सिन्नर येथे पुन्हा भीषण अपघात; 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • समोरुन येणारी स्विफ्ट कार आणि इनोव्हा कार यांना धडक बसल्याने तिन्ही गाड्याचं मोठं नुकसान.
  • जखमींवर चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांचीही मृत्यूशी झुंज सुरु आहे.
  • या अपघातातील तीन मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली असून इतर दोघांची ओळख अजूनही पटलेली नाही.

नाशिक : सिन्नर (Sinnar) येथील मोहदरी घाटात (Mohdari Ghat) शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.  तर 4 जण जखमी झाले आहेत. नाशिक येथील कॉलेजात शिकणारे विद्यार्थी स्विफ्ट (Swift) कारने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. संगमनेरहून लग्न सोहळा पार पाडून ते परतत होते. शुक्रवारी संध्याकाळ स्विफ्ट कार मोहदरी घाटावर आली. त्याच वेळेस कारचा टायर फुटल्याने कार लेन ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वाहनांवर आदळली.  (Another terrible accident at Sinnar; Car tires brust killed 5 students)

अधिक वाचा  : कुठे पाहणार भारत-बांगलादेशमधील 3rd ODIसामना

समोर आलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कारमधील विद्यार्थी हे आपल्या मित्राच्या लग्नाला गेले होते. लग्नाचा कार्यक्रम पार पाडून परताना हा अपघात झाला. शुक्रावारी संध्याकाळी मोहदरी घाटावर कार आली असताना  भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारचे टायर फुटले आणि हा अपघात घडला. टायर फुटल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि स्विफ्ट कार लेन ओलांडून विरुद्ध दिशेला गेली.

समोरुन येणाऱ्या वाहनांना या कारने जोरदार धडक दिली. समोरुन येणारी  स्विफ्ट कार आणि इनोव्हा कार यांना धडक बसल्याने तिन्ही गाड्याचं मोठं नुकसान झाले. या अपघातात 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान,  स्विफ्ट कारमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने आणि वेग वाढल्याने हा अपघात झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी तपासही केला जाणार आहे.

अधिक वाचा  :  11 डिसेंबर भारतीय भाषा दिवस, नवे शब्द शोधण्याची स्पर्धा

या अपघातातील तीन मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली असून इतर दोघांची ओळख अजूनही पटलेली नाही. सायली पाटील, प्रतीक्षा दगू घुले आणि शुभम तायडे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अन्य जखमी विद्यार्थ्यांवर सिन्नर आणि नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींवर चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांचीही मृत्यूशी झुंज सुरु आहे. या अपघातातामुळे पाच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अपघातातील जखमींची नावे :

साक्षी नितीन घायाळ
साहिल गुणवंत वारके
गायत्री फरताळे
सुनील ज्ञानेश्वर दळवी

दरम्यान, गुरुवारी नाशिक-पुणे हायवेवर एसटी बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीवरुन जाणाऱ्या मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू झालेला. ही घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये झालेल्या आणखी एका भीषण अपघातामुळे रस्ते अपघातांचा प्रश्न अधोरेखित केलाय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी