माझे ज्ञान आहे त्यानुसार अटकेचा आदेश काढला, नाशिक पोलिस आयुक्तांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

माजी मुख्यमंत्री खूप सुज्ञान आहेत. त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे. त्यांना माझं चॅलेंज नाही. माझंही थोडं ज्ञान आहे त्यानुसारच मी आदेश काढला, असे रोखठोक प्रत्युत्तर  दीपककुमार यांनी दिलं आहे.

As far as I know, an arrest warrant was issued, Nashik Police Commissioner replied to Fadnavis
 नाशिक पोलिस आयुक्तांचे फडणवीसांना प्रत्युत्तर 
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल रात्री उशीरा कोर्टाने जमीन दिला आहे.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने गुन्हा दाखल केला होता.
  • राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाशिक पोलीस आयुक्तांना सूचक इशारा देत ते छत्रपती आहेत का? असा सवाल केला.

नाशिक :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल रात्री उशीरा कोर्टाने जमीन दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने गुन्हा दाखल केला होता. मात्र कालच त्यांना जमीनही मिळाली आहे. नाशिकमध्ये त्यांच्याविरोधात पहिला गुन्हा नोंद झाला आणि थेट अटकेचा आदेश निघाला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाशिक पोलीस आयुक्तांना सूचक इशारा देत ते छत्रपती आहेत का? असा सवाल केला. यावर आता नाशिकचे पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे यांनी प्रत्युत्तर दिलंय. माजी मुख्यमंत्री खूप सुज्ञान आहेत. त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे. त्यांना माझं चॅलेंज नाही. माझंही थोडं ज्ञान आहे त्यानुसारच मी आदेश काढला, असे रोखठोक प्रत्युत्तर दीपककुमार यांनी दिलं आहे.

मला जेवढे ज्ञान त्यानुसार आदेश काढला

माजी मुख्यमंत्री साहेब हे खूप सुज्ञानी आहेत, त्यांचा कायद्याचा अभ्यास आहे, त्यांना काही चॅलेंज नाही. माझं थोडं ज्ञान आहे, माझी शिकवण आहे, त्यानुसार आदेश काढला, तर तो चुकीचा असेल, संविधानाच्या 236, 237 खाली न्यायालयात जाऊन क्रॉस करू शकतात. मी माझ्या आदेशावर ठाम आहे, न्यायसंगत आहे. मात्र काल राणे साहेबांना जामीन मंजूर झाला, साहेबांनी लिहून दिलं आहे अशी पुनरावृत्ती होणार नाही, म्हणून अटक करण्याचा अर्थ नाही, त्यामुळे मंत्रिमहोदयांना नोटीस देऊन पूर्तता केली, असे दीपक कुमार पांडे म्हणाले 

आमच्या केसमध्ये अजून अटकेची कारवाई झालेली नाही

नारायण राणेंना जामीन हा महाड कोर्टाकडून त्या खटल्यात मिळाला आहे. आमच्या केसमध्ये अजून अटकेची कारवाई झालेली नाही. आम्ही फक्त 2 सप्टेंबरला हजर राहून तपासात सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्यांनी ते स्वीकारलं आहे. मी या कारवाईबाबत समाधानी आहे, असेही पोलीस आयुक्तांनी नमूद केलं आहे.

राणे कधीही येऊ शकतात. त्याबाबत त्यांना मूभा आहे

नारायण राणे कधीही येऊ शकतात. त्याबाबत त्यांना मूभा आहे. सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे. ते सहकार्य करत आहेत, आदर करतो, स्वागत करतो. सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. त्याच्या संदर्भात जे कोणी व्यक्ती आहेत, त्यांचा जबाब नोंदवला जातो. पुरावे सादर करण्यासाठी मुभा दिली जाते. मंत्रिमहोदयांना 2 सप्टेंबरची तारीख दिली आहे. ती त्यांनी स्वीकारली आहे. साहेब तुम्ही या आणि तुमचा जबाब नोंदवा,” असे ते पुढे म्हणाले आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी