भाजपला मोठा धक्का, दोन दिग्गज नेत्यांच्या हाती शिवबंधन

नाशिक
सुनिल देसले
Updated Jan 08, 2021 | 15:09 IST

Big jolt to BJP in Maharashtra: भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे. भाजपचे नेते वसंत गिते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Big jolt to BJP in maharashtra as vasant gite and sunil bagul leaves party and join shiv sena
भाजपला मोठा धक्का, दोन दिग्गज नेत्यांच्या हाती शिवबंधन  |  फोटो सौजन्य: Twitter

नाशिक : शिवसेनेने (Shiv Sena) भारतीय जनता पक्षाला (Bhartiya Janata Party) मोठा झटका दिला आहे. भाजपचे नेते वसंत गिते (Vasant Gite) आणि सुनील बागुल (Sunil Bagul) यांनी भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत वसंत गिते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे बळ आणखी वाढले आहे.

वसंत गिते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, "शिवसेनेत प्रवेश केल्यावर आता वसंत गिते आणि सुनील बागुल हे दोन्ही नेते मुंबईत जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. वसंत गिते आणि सुनील बागुल हे नाशिक जिल्हा शिवसेनेचा भक्कम गड बनावा यासाठी ते प्रयत्न करतील. मी शिवसेनेच्या वतीने बागुल आणि गिते यांचं मनापासून स्वागत करतो."

नाशिकमधील प्रत्येक पदाधिकारी, शिवसैनिकाने त्यांचं मनापासून स्वागत केलं आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षात कोणतेही मतभेद नाही हे स्पष्ट दिसत आहे.वसंत गिते आणि सुनील बागुल हे पुन्हा एकदा भगव्या शालीखाली आले आहेत आणि आता नाशिकची ही भगवी शाल आणखी उबदार होईल असेही संजय राऊत यांनी म्हटलं.

संजय राऊत यांनी पुढे म्हटलं, "प्रवाह बदलतोय, हवा बदलतेय. नाशिक मनपात किंवा जिल्ह्यात काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेसोबत संपर्क साधला आणि त्यांना पक्षात प्रवेश करुन सक्रीय काम करायचं आहे."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी