धुळे आणि नाशिक लोकसभेचं गणित बदलणार, भाजप नेते अद्वय हिरेंचा ठाकरे गटात प्रवेश

Advay Hire Entry in shivsena : नाशिकमधील भाजप नेते अद्वय हिरेंनी आज शिवसेनेत (ठाकरे गट) उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी हिरेंनी आपल्यावर वारंवार पक्ष बदलाचा आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधत भाजप सोडण्याचा अख्खा किस्साच सांगितला.

BJP leader Advay Hiren joins Thackeray group
... पण माझा नाईलाज होता, भाजप नेते अद्वय हिरेंचा ठाकरे गटात प्रवेश   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का
  • अद्वय हिरेंचा ठाकरे गटात प्रवेश
  • भाजप आणि शिंदे गटावर निशाणा

मुंबई : नाशिकमधील भाजपचे नेते अद्वय हिरे पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अद्वय हिरे यांच्या रुपात संस्थात्मक जाळं असलेले आणि कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क असणारा नेता ठाकरे गटाला मिळाला आहे. अद्वय हिरे यांनी यापूर्वी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून सुहास कांदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी पन्नास हजारांहून अधिक मतं घेतली होती. त्यांचा नाशिक आणि धुळे लोकसभा मतदारसंघात प्रभाव असल्याने या दोन्ही मतदारसंघातील भाजपची गणितं बिघडणार आहेत.(BJP leader Advay Hiren joins Thackeray group) 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधल्यानंतर हिरे म्हणाले, मी कधीही भाजपकडे कोणतेही पद मागितले नाही, मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न नेहमीच मांडला. भाजपने शेतकऱ्यांना कोणतीही मदत न केल्याने मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या काळातील पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत, तर पक्षात व्यक्ती स्वातंत्र्य नाही, बोलण्यास स्वातंत्र्य नाही, आमचं सगळं स्क्रिप्टेड असतं, त्यामुळे मी बोलत नव्हतो तर भाजप बोलत होतं, अशा शब्दांत अद्वय हिरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

अधिक वाचा : Dhule crime : एटीएम कार्डची अदलाबदली करून पैसे काढणारे सराईत गुन्हेगार अटकेत

गावागावात असंख्य पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये सामावून घेत पदावर बसवलं. पण आता पन्नास गद्दार मांडीवर बसल्यानंतर भाजपला आमची गरज राहिली नाही. पैशांसाठी व सत्तेसाठी बाप बदलणारी औलाद आपली नाही. आणि कितीही खोके दिले तरी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणार नाही, अशा शब्दात दादा भुसे यांच्यावर अद्वय हिरे यांनी टिका केली.  

त्याच वेळी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की महाविकास आघाडीसाठी लोकसभेच्या 34 जागांवर विजय होणार असल्याचा अंदाज सर्वेक्षण एजन्सींनी केला आहे. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत MVA किमान 40 जागा जिंकेल असा दावा त्यांनी केला.

अधिक वाचा : Mumbai: आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून बनवला व्हिडिओ अन्...

अद्वय हिरे पाटील यांच्या कुटुंबाचा उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे. महाराष्ट्राचे माजी परिवहन मंत्री प्रशांत हिरे यांचे ते पुत्र आहेत. अद्वय हिरे हे नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे मालेगावचे शिंदे गटाचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा सामना करण्यासाठी उद्धव ठाकरेंना आता तगडा नेता मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी