Burning Train : बर्निंग ट्रेन : गांधीधाम-पुरी एक्सप्रेसला महाराष्ट्रात लागली आग

नाशिक
रोहन जुवेकर
Updated Jan 29, 2022 | 20:45 IST

Burning Train : Gandhidham-Puri Express train catches fire near Nandurbar station in Maharashtra : गांधीधाम-पुरी एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२९९३) या लांब पल्ल्याच्या गाडीला नंदुरबार स्टेशन येथे आग लागली. गाडीच्या पँट्री कारमध्ये आग लागली. 

Burning Train : Gandhidham-Puri Express train catches fire near Nandurbar station in Maharashtra
गांधीधाम-पुरी एक्सप्रेसला महाराष्ट्रात लागली आग 
थोडं पण कामाचं
  • गांधीधाम-पुरी एक्सप्रेसला महाराष्ट्रात लागली आग
  • गाडीच्या पँट्री कारमध्ये लागली आग
  • आग नियंत्रणात आणण्यात यश, जीवितहानी नाही

Burning Train : Gandhidham-Puri Express train catches fire near Nandurbar station in Maharashtra : नंदुरबार : गांधीधाम-पुरी एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२९९३) या लांब पल्ल्याच्या गाडीला नंदुरबार स्टेशन येथे आग लागली. गाडीच्या पँट्री कारमध्ये आग लागली. 

गाडीच्या २२ कोचपैकी (रेल्वेचे डबे) तेराव्या क्रमांकाचा कोच हा पँट्री कारचा होता. आग लागताच तातडीने रेल्वेची यंत्रणा सक्रीय झाली. यामुळे आग लवकर नियंत्रणात आली. आग पसरली नाही. गांधीधाम-पुरी एक्सप्रेसचे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत; अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

आग लागण्याची घटना सकाळी १०.३५ वाजता घडली. रेल्वेच्या यंत्रणेने तातडीने पँट्री कार इतर डब्यांपासून वेगळी केली. अग्नीशमन दलाने वेगाने हालचाली करून आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. आग प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.

वाहतूक सुरळीत केली

आग लागल्यावर नंदुरबार स्टेशनमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली होती. आग नियंत्रणात आल्यानंतर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास वाहतूक पुन्हा सुरू करून सुलळीत करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी