कोविड रुग्णालयात पाहणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना चिडवलं; पोलिसांकडून गुन्हा दाखल

नाशिक
भरत जाधव
Updated May 02, 2021 | 11:09 IST

राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना चिडवणं नाशिकमधील पाच जणांना महागात पडलं आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करणाऱ्यांवर पोलिसांनी दोन दिवसात गुन्हा दाखल केला.

opposition leader devendra fadnavis
कोविड रुग्णालयात पाहणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना चिडवलं  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • देवेंद्र फडणवीस यांना चिडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल
  • बिटको कोविड रुग्णालयाला देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती भेट
  • पाच जणांवर गुन्हा दाखल

नाशिक : राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना चिडवणं नाशिकमधील पाच जणांना महागात पडलं आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करणाऱ्यांवर पोलिसांनी दोन दिवसात गुन्हा दाखल केला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) हे नाशिक (Nashik) येथील कोविड रुग्णालयात (Covid19 Hospital) पाहणीसाठी गेले असताना काही जणांनी अश्लाघ्य भाषेत त्यांच्यावर टिप्पणी केली. करत व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणीस यांनी 30 एप्रिलला नाशिक महानगरपालिकेच्या बिटको (Bitco) कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत गिरीश महाजन देखील होते.  देवेंद्र फडवणीस बिटको रुग्णालयात प्रवेश करत असताना काहीजण त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करत होते. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी याचा व्हिडीओ देखील बनवला. फडणवीस हे आढावा घेत असताना काही व्यक्तींनी व्हिडिओ काढून देवेंद्र फडवणीस यांना चिडवत होते. हे या व्हिडिओच्या चित्रीकरणात दिसत आहेत.  याप्रकरणी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन 2 दिवसांच्या आत गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी