छगन भुजबळांचा 'सेफ गेम'

नाशिक
रोहन जुवेकर
Updated Feb 18, 2022 | 23:34 IST

Chhagan Bhujbal's 'Safe Game' : छगन भुजबळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना ज्या पद्धतीने उत्तरे दिली त्यावरून भुजबळांच्या 'सेफ गेम'ची चर्चा जोरात आहे.

Chhagan Bhujbal's 'Safe Game'
छगन भुजबळांचा 'सेफ गेम' 
थोडं पण कामाचं
  • छगन भुजबळांचा 'सेफ गेम'
  • भुजबळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना ज्या पद्धतीने उत्तरे दिली त्यावरून भुजबळांच्या 'सेफ गेम'ची चर्चा जोरात
  • मी भविष्यवेत्ता नाही तर... - भुजबळ

Chhagan Bhujbal's 'Safe Game' : नाशिक : भ्रष्टाचाराचे आरोप, संपत्तीबाबतचे प्रश्न अशा वेगवेगळ्या मुद्यांवरून महाराष्ट्रात मुख्य सत्ताधारी पक्ष शिवसेना सध्या चर्चेत आहे. या वातावरणात राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसने सावध पवित्रा घेतल्याचे चित्र आहे. ठाकरे सरकारचे कॅबिनेटमंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना ज्या पद्धतीने उत्तरे दिली त्यावरून भुजबळांच्या 'सेफ गेम'ची चर्चा जोरात आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणीपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च २०२२ रोजी जाहीर होईल. या निकालाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर पडतील अशी चर्चा राजकीय अभ्यासकांमध्ये सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अशाच स्वरुपाचे सूतोवाच केले आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी येवल्यात छगन भुजबळ यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना मी भविष्यवेत्ता नाही तर सामान्य भाजीवाला आहे, असे भुजबळ म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या रायगड जिल्ह्यातील संपत्तीवरून माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. याच मुद्यावर प्रश्न विचारताच टीव्हीवर माध्यमांनी जे दाखवले त्यात एक पडके घर दिसत होते अशा स्वरुपाचे उत्तर भुजबळ यांनी दिले. 

मुंबईत सांताक्रुझ येथे असलेल्या भुजबळ फार्महाऊसची पाहणी केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांना नोटीस देण्यात आली आहे. या संदर्भात विचारले असता ही नोटीस पोलसांनी दिली आहे, असे भुजबळ म्हणाले. सोमय्या काही जणांना घेऊन आले होते. यामुळे घराच्या परिसरात गर्दी झाली. सध्याच्या कोरोना संकटात गर्दी झाल्यामुळे स्पष्टीकरण मागण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली असेल; असे भुजबळ म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी