Nashik News : शिंदे गट आणि ठाकरे गटात वादावादी, शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा हवेत गोळीबार

नाशिक
भरत जाधव
Updated Jan 20, 2023 | 07:51 IST

शिवजयंती साजरी करण्यासाठी ठाकरे गट ((Thackeray group) बैठकीसाठी जमले होते. तर त्याच ठिकाणी शिंदे गटातील (Shinde group) काही कार्यकर्ते बैठकीसाठी जमले होते. या बैठकीवेळी किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली यावरून दोन्ही गट आमनेसामने आले.

Controversy between Shinde group and Thackeray group
शिंदे गट आणि ठाकरे गटात वादावादी  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • शिंदे गटाने शिवजयंतीच्या नियोजनासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
  • बैठकीवेळी किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली यावरून दोन्ही गट आमने-सामने आले.
  • शिवजयंतीच्या नियोजनासाठी बोलवलेल्या बैठकीत गोळीबार

नाशिक :  शहरातील देवळाली गाव परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटात गुरुवारी बाचाबाची झाली. शिवजयंती साजरी करण्यासाठी ठाकरे गट ((Thackeray group) बैठकीसाठी जमले होते. तर त्याच ठिकाणी शिंदे गटातील (Shinde group) काही कार्यकर्ते बैठकीसाठी जमले होते. या बैठकीवेळी किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली यावरून दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटे (Suryakant Lavte) यांच्या मुलाने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार (Firing) केला.  (Controversy between Shinde group and Thackeray group, firing on air )
 

 अधिक वाचा  : पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जाहीर

 हवेत गोळीबार केल्याचं समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी संशयित स्वप्निल लवटेला ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. शिवजयंतीच्या नियोजनासाठी बोलवलेल्या बैठकीत गोळीबार झाल्याची चर्चा आहे. शिवजयंतीच्या नियोजन बैठकीदरम्यान ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आल्याने हा राडा झाल्याचे बोलले जात आहे. 

अधिक वाचा  : Rakhi Sawant ला अटक, Mumbai Police कारवाई

शिंदे गटाने शिवजयंतीच्या नियोजनासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्याचवेळी ठाकरे गटानेही त्याच ठिकाणी ठाकरे गटाकडून बैठकीचे आयोजन केले होते. बैठकी दरम्यान दोन्ही गट आमनेसामने आल्याने जोरदार वाद झाला. एका गटाकडून हवेत गोळीबार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी