अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराची तक्रार

नाशिक
रोहन जुवेकर
Updated May 29, 2021 | 16:32 IST

अनिल परब हे बढती देण्यासाठी पैसे घेतात अशी तक्रार परिवहन खात्यातील अधिकाऱ्याने नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात केली आहे.

corruption allegations against anil parab complaint lodged in nashik
अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराची तक्रार 
थोडं पण कामाचं
  • अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराची तक्रार
  • मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केले ट्वीट
  • ३०० कोटी रुपयांच्या ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळ्याचा आरोप

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू समजले जाणारे महाराष्ट्राचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल परब हे बढती देण्यासाठी पैसे घेतात अशी तक्रार परिवहन खात्यातील अधिकाऱ्याने नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात केली आहे. या संदर्भात मनसेच्या संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केले आहे. corruption allegations against anil parab complaint lodged in nashik

परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नती अर्थात बढतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो, असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचे या तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी तक्रार नोंदविल्यानंतर चौकशी सुरू केली आहे. 

सरकार टिकविण्यासाठी पाच तास महायज्ञ, नितेश राणेंचा आरोप

याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप पत्राद्वारे केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता महाराष्ट्राच्या परिवहनमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी