Lasalgaon Positive Story: स्पर्धेमुळे सुटली बाजार समितीवरील आमवस्या, अन् पैसा झाला मोठा

नाशिक
भरत जाधव
Updated Feb 11, 2022 | 16:31 IST

Lasalgaon Agriculture Produce Market Committee : वाहनांचा आवाज, मार्केटमधील (Market) व्यापाऱ्यांच्या (merchants) लिलावाचा (auction) आवाज, कामांसाठी मार्केटच्या या भागातून त्या भागात पळणारी मजूर मंडळी,  शेतमाल (Commodities) विकायला आलेली शेतकरी असंच चित्र आपल्याला लासलगाव बाजार समितीमध्ये साधरण सर्वच दिवशी दिसतं.

Lasalgaon Agriculture Produce Market Committee
लासलगाव समितीनं आमवस्या पळवली, अन् धनासोबत कमवलं नाव  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लासलगाव समितीमधून सुमारे 76 देशांमध्ये होते कांदा निर्यात.
  • जून महिन्यापासून कांदा लिलावाच्या उलाढालीत 250 कोटींची वाढ
  • मार्केटमधील मजूरवर्ग समितीच्या आणि व्यापारी लोकांनी घेतलेल्या या निर्णयावर खूश

Lasalgaon Agriculture Produce Market Committee : नाशिक : वाहनांचा आवाज, मार्केटमधील (Market) व्यापाऱ्यांच्या (merchants) लिलावाचा (auction) आवाज, कामांसाठी मार्केटच्या या भागातून त्या भागात पळणारी मजूर मंडळी,  शेतमाल (Commodities) विकायला आलेली शेतकरी असंच चित्र आपल्याला लासलगाव बाजार समितीमध्ये साधरण सर्वच दिवशी दिसतं. बाजार समिती (Market Committee) किंवा कांदा मार्केट (Onion Market) चालू असलं तर पूर्ण लालसगावात (Lalasgaon) गजबज असतं.

लासलगाव म्हटलं तर आपल्यासमोर येतं कांदा मार्केट, बरोबर ना,  ही कांदा मार्केट आशियातील सर्वात मोठा बाजारपेठ. लासलगाव बाजार समिती (Lasalgaon Market Committee) ही जगप्रसिद्ध आहे. या बाजार समितीतून फ्रान्स ,केनिया, कॅनडा, स्पेन, युनायटेड स्टेटस्, ओमान, व्हियेतनाम, सोशल रिपब्लिक, मालदीव, युनायटेड किंगडम, बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब, अमिराती, नेपाळ, सिंगापूर,इंडोनेशिया, कतार, कुवेत, मोरिशस, सौदी अरेबिया, बेहरीन, रियुनियन, रशिया, ग्रीस, हाँगकाँग, थायलंड, ब्रुनेई, पाकिस्तान, इटली, नेदरलँड्स, सेशल्स, कोमोरेझ यांसह सुमारे 76 देशांमध्ये कांदा निर्यात होते.

साधरण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थापन झालेली बाजार समिती इतिहास घडवणारी म्हणून नेहमी ओळखली जाते. नेहमी वर्दळ असलेली बाजार समिती मात्र एका दिवशी पूर्ण शांत होत असतं. तो दिवस म्हणजे आमवस्याचा दिवस. 1947 पासून लासलगाव बाजार समितीची स्थापना झाली. समिती सुरू होण्याचा  काळ हा अनेक रुढी, परंपरा,  अंधश्रद्धा पाळणारा काळ. या काळात उद्यास आलेली लासलगाव बाजार समितीही आपल्याबरोबर रुढी आणि अंधश्रद्धाचा बोझ घेऊन मोठी झाली. आमवस्येच्या भीतीपोटी नेहमीची वर्दळ नाहीसी होतं. आमवस्या अन् सुट्ट्यांमुळे आपला माल विकला जात नव्हता म्हणून शेतकरी हताश होत. परंतु गेल्या वर्षाभरापूर्वी घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे  बाजार समितीचं सर्वत्र कौतुक होत आहे. याला कारणीभूत ठरले आहे,  लासलगाव समितीतील पहिल्या महिला सभापती सुवर्णा जगताप आणि व्यापाऱ्यांचा आधुनिक विचार.

Read Also : दुनियाला वाचवण्यासाठी 'शक्तिमान' परतणार मोठ्या पडद्यावर

आपल्या समाजात स्त्रीला खूप महत्त्व आहे. एक नव्या पर्वाला सुरुवात करणारी किंवा नवं जग निर्माण करणारी असं स्त्रीविषयी म्हटलं जातं. याचा प्रत्यय लासलगाव बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती यांनी आमवस्या आणि शनिवारी बाजार चालू ठेवण्याचा निर्णयाने दिला. आपल्या निर्णयाविषयी बोलताना सभापती बाई म्हणतात,  स्त्रियांना अनेक क्षेत्रात महिला म्हणून आपली योग्यता सिद्ध करावी लागते. हीच गोष्ट डोक्यात ठेवत आपण बाजार समितीचा विकास,  कसा होईल. कोणत्या गोष्टी केल्यानं समितीला फायदा होईल, याचा विचार करुन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

laslgaon 4

या निर्णयाचं फलित म्हणूनच लासलगाव बाजार समितीने जून  महिन्यापासून कांदा लिलावाच्या उलाढालीत 250 कोटींची वाढ केली आहे. एका वर्षात साधरण 48 शनिवार, रविवार 48, बारा आमवस्या दिवाळीच्या सुट्ट्या आणि इतर सार्वजनिक सुट्ट्या  पकडल्यातर तीन महिने काम बंद असायचं. नवीन नियमामुळे या दिवसांचं काम वाढलं. मार्केटमधील मंजुरांच्या हाताला काम आलं. मार्केटमधील मजूरवर्ग समितीच्या आणि व्यापारी लोकांनी घेतलेल्या या निर्णयावर खूश आहेत. मजुरांचं असं असतं, ते जेव्हा काम करतील तेव्हा त्यांना खायाला मिळेल. यामुळे बाजार समितीने सुट्ट्या जरी कमी केल्या तरी मजुरांना त्याचं दु:ख नसून उलट पैसा वाढत असल्याचा आनंद आहे, असं मार्केटमधील कामगार युनियनचे चेअरमन सांगतात.

laslgaon 5 story.j

या ऐतिहासिक निर्णयाची सुरुवात आणि त्यामागील झालेल्या घडामोडीविषयी टाइम्स नाऊ मराठीशी बोलाताना सभापती सुवर्णा जगताप ताई म्हणाल्या की,  ‘’निर्णय घेणं सोपं होतं पण त्याची अंमलबजावणी करणं,  हे अवघड असतं. सुरुवात होणं गरजेचं असतं’’. वाचक मंडळी तुम्ही म्हणाल की,  काय तो मोठा निर्णय आहे का?. पण तुम्हाला माहिती आहे, आधीपासून चालू असलेली परंपरा मोडीत काढणं किंवा रुढीला खंडीत करुन नवीन पायवाट सुरू करणं हे मोठं जिकरीचं काम असतं. समाज सुधारकांनी अनेक रुढी, परंपरांना आळा घातला आहे, समाजाला नव्या दिशा दिल्या आहेत. ते काम करत असताना इतर लोकांकडून किती त्रास  होत असतो याची माहिती आपल्याला आहेच.

काय होतं आव्हान...

दरम्यान सभापती जगतापताई म्हणतात, की नवीन विचार आणण्याचा आणि मत परिवर्तन करणं हे काही लगेच होत नाही. परिर्तवन केल्यानंतर लागलीच त्याचा फायदा होईल,  असेही नाही. त्यासाठी काही तरी काळ लागतो. यामुळे नवीन बदल घडवून आणणे हे एक आव्हानात्मक काम होतं. टाइम्स नाउ मराठीशी बोलातना सभापती ताई म्हणाल्या की,  महिला म्हणून मला नेहमी पाठिंबा मिळत गेला. काही इतर कामात काहीसा विरोध झाला पण या निर्णयाला बऱ्याच व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला.

अनेक ठिकाणी महिलांना आपली योग्यता दाखवावी लागते. इतर लोकांपेक्षा आपण कसे चांगले आहोत.  आपलं नेतृत्व कसं योग्य आहे,  हे दाखवून द्यावे लागते. कोरोना काळातही बाजार समितीमध्ये लोककल्याणाची कामे करण्यात आली. प्रत्येक शेतकऱ्यांना मास्क वाटणं असो किंवा महिलांचे लसीकरण,  अशी कामे समितीमार्फत करण्यात आली आहेत. याशिवाय इतर प्राथमिक सुविधांची कामेही मला करावी लागली. व्यापाऱ्यांना आणि बाजार समितीत शेतीमाल विकायला आलेल्या शेतकऱ्यांच्या काय गरजा आहेत,  त्यांच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेऊन त्यावर प्राथमिकतेने काम करावं लागतं.  

आमवस्या सुटायला लागला 30 दिवसांचा काळ

सभापती जगतापताई म्हणतात,  जवळ-जवळ 75 वर्षापासून लोकांच्या मनात घरून बसलेली आमवस्या आहे. ही रुढी, धारणा बदलण्यासाठी पुरेसा वेळ लागणं हे ठाऊक होतं. पण किती कालावधी लागेल किंवा नवीन चाल व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग स्वीकारतील का?  लोकांच्या मनातील आमवस्येचं भूत काढायचं होतं. ते लगेच निघेल का याविषयी शंका होतीच.  पण बदल करायचा तर धोका पत्कारावा लागेल,  असं ठरवून सभापती ताई व्यापाऱ्यांच्या पुढे आमवस्येला लिलाव सुरू करण्याचा प्रस्ताव मांडत असतं. त्याच्या या प्रस्तावाला काही व्यापारी पूर्णपणे पाठिंबा देत होते. तेही लिलाव चालू करण्याविषयी आग्रही आणि उत्सुक होते.

laslgaon 3

पण काही लोक होती त्यांच्या मनात मात्र रुढीचा मोठा पगढा होता. प्रत्येक बैठकीत यावर चर्चा केली जात. एका महिन्यात साधरण तीन चार बैठका घ्याव्या लागल्या. परंतु प्रत्येक बैठकीत व्यापारी आपला वायदा वाढवत. याविषयी बोलताना व्यापारी म्हणतात,  पूर्वज काय चुकीचे होते का?  त्यांना तुम्ही वेडे ठरवत आहात का? त्यांनी का बंद का केलं ते विचारायला त्यांच्याकडे जा.

ही परंपरा आहे एक रुढी आहे. हे आपण जपलं पाहिजे. जर आमवस्या वाईट नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांची लग्न सोहळे,  इतर देवांची कामे त्या दिवशी का करत नाहीत. आमवस्या वाईट असल्यानेच आपल्या पूर्वजांनी ते बंद केलं होतं,  म्हणून आपण त्याचे पालन केलं पाहिजे. यावर शेतकरी ही त्यात हो मिळवत होती. पण बैठकीत नेहमी-नेहमी फायदा सांगितल्याने आणि विचारणा केल्याने व्यापारी शेवटी लिलावासाठी तयार झाले.

काय बंद ठेवली जात असायची बाजारपेठ

आमवस्य़ा म्हणजे काळोखाचा दिवस. हा काळोख आपल्या व्यवहारात, जीवनात, आय़ुष्यात नसावा,  असं प्रत्येकाला वाटतं. या दिवशी काही शुभ कार्य करणं टाळलं जातं. हाच धागा पकडत बाजार समिती बंद ठेवली जातं. आमवस्या वाईट दिवस व्यापारी किंवा व्यावसायिक लोक काटा करत नसतं. कोणतीच वस्तू मोजत नसतं. कोणताच नवीन व्यवहारदेखील केला जात नसतं. साधरण आमवस्य़ाविषयी लोकांची धारणा अशी असते, या दिवशी काळोख असतो. हा दिवस अशुभ असतो यादिवशी भूत, प्रेत आत्मा अधिक ताकदवान होऊन व्यक्तीला पिछाडतात. यामुळे या दिवशी शुभ कामे केली जात नाहीत. शुभ कामांसाठी दुसऱ्या गावी जाणं बऱ्याच वेळा टाळलं जातं.

Read Also : आता नोकरदारांना मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन! मोठी घोषणा

याविषयी बोलताना सभापती ताई म्हणतात,  आमवस्येला बाजार का बंद असायचा हे सांगता येणार नाही. पूर्वीच्या लोकांनी,  असा निर्णय का घेतला यावर आपण काही बोलू शकणार नाही. ती एक रुढी, अंधश्रध्दा म्हणा किंवा भावना. पण तो दिवस वाईट समजतं असल्यानं व्यवहार केला जात नसायचा. कादाचित पूर्वी वाहतूक सुविधा अधिक नव्हत्या. यादिवशी रात्री अंधार असतो,  वाहतूक सुविधा नसल्यानं शेतकरी कदाचित प्रवास करणं टाळत असावेत. आधीच्या काळी बाजार समित्यांमध्ये राहण्याची सुविधा नसाव्यात. त्यामुळे व्यवहार बंद राहत असावा. याविषयी बोलताना लासलगाव बाजार समितीचे सचिव वाढवणे म्हणतात, 70 -75 वर्षापूर्वी एखादी अशुभ घटना घडली असेल कदाचित,  असं बाजारातील सर्वजण म्हणतात. आपण त्यांची बाजू लक्षात घेत, आमवस्येला ग्रामदेवांची पूजा-अर्चा करुन त्यांच्या नावाचा जय घोष करत व्यवहार सुरू करू केला जात आहे. 

laslgaon story

मार्केटमधील मजूर म्हणातात, आमवस्येला का काम बंद असायचं हे काही माहिती नाही. व्यापारी लिलाव बंद ठेवतात म्हणून आम्ही कामाला सुट्टी घेत असायचो. आमवस्येचं भूत हे न दिसणारं होतं,  याला कशा पद्धतीने काढणार असा प्रश्न अनेकांना होता. आमवस्येला व्यवहार करणं वाईट होतं, पण नेमकं काय वाईट होतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न आधी करण्यात आला. सुरुवातीला काही प्रमाणात लिलाव सुरू करण्यात आले. बैठकीत निर्णय झाल्यानंतर व्यापारी म्हणायचे ही जुनी परंपरा आहे,  आपण मोडत आहोत, नुकसान होईल.  त्यावर सभापती ताई यांनी व्यापाऱ्यांना विश्वास दिला. काय नुकसान होतं ते पाहुया. जर खूप मोठं नुकसान झालं तर आपण आमवस्य़ेची प्रथा चालू ठेवू. जर ज्या व्यापाऱ्यांना नाही पटलं तर त्यांनी लिलाव केला नाही तरी चालेल, असं ठरवून आमवस्येला दूर करण्याचा प्रयत्न झाला.

शनिवारी का बंद असायचा व्यवहार

शनिवारी पूर्णत व्यवहार असायचं असं,  अर्धा दिवस लिलाव केला जात असायचा. पण आता अधिक संख्येत लिलाव या दिवशी केला जात असायचा.  यादिवशीही लिलाव सुरू ठेवण्याविषयी सभापती म्हणतात, एखाद्या शेतकऱ्याला पैशांची गरज असेल आणि बाजारपेठ बंद असेल तर पैशांची पुर्तता कशी करणार ही समस्या दाखवल्यानंतर शनिवारी बाजार सुरू करण्याविषयी प्रस्ताव ठेवला होता. एका वर्षभरात 48 ते 50 शनिवार येत असतात. सभापती सुवर्णाताई जगताप ह्या कॉम्प्युटर, इंजिनिअर आहेत. लग्नाआधी त्या टेलकोमध्ये काम केल आहे. टाटा मोटर्समध्येही त्यांनी काम केलं आहे. कंपनीचं प्रोडक्शन वाढविण्यासाठी काय करावं लागेल, याचा अनुभव त्यांना होता. बाजार समितीचं उत्पन्न वाढविण्यासाठी अधिक दिवस समितीचं कामकाज चालू ठेवावे लागेल. दिवाळीला साधरण 10 दिवस बाजार समिती बंद असायची. पण त्याही सुट्ट्या कमी करण्यात आल्या.  

आमवस्येचं भूत कसं झालं दूर

हा निर्णय घेणं सोपं होतं, पण याची सुरुवात होणं खूप अवघड होतं. प्रत्येकाचं   मत परिवर्तन करणं अशक्य गोष्ट होती. 75 वर्षापासून ही रुढी चालू होती ते बंद करुन आपण चूक करतोय का अशी शंका अनेक व्यापाऱ्यांच्या मनात होती. जर खरं काही वाईट होत असेल तर होणारं नुकसान सोसवणारे असेल का ही प्रश्न नेहमीची होती. यावर उत्तर काढत सभापती सुवर्णा जगतापताई म्हणाल्या की, जर नुकसान झालं तर आपण नंतर बाजार भरवणं बंद करू. व्यापाऱ्यांपुढे आर्थिक गणित मांडण्यात आले.

स्पर्धेपुढे आमवस्या हरली

व्यापाऱ्यांना आर्थिक गणित समजवत वर्षभर काम चालू ठेवण्यात आलं. यात शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा फायदा कसा आहे, हे गणित सांगून मत परिवर्तन करावं लागलं. एका सकारात्मक निर्णयाला पाठिंबा दिल्यानं बाजार समितीला अडीच कोटींचा फायदा झाला. याविषयी बोलताना बाजार समितीचे सचिव वाढविणे म्हणाले की,  मनातील गैरससमज काढताना स्पर्धेचं गणित सांगावे लागले. जर आपण अधिक उत्पन्न वाढवलं नाही तर समितीची गुणवत्ता आणि विश्वासर्हता कमी होईल आणि आपलं नुकसान होईल.  

लासलगाव बाजार समिती ही कांदा उत्पादनासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना रास्त दर मिळत असतो. यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातील शेतकरी आपल्या जवळील बाजारपेठ सोडून लासलगाव समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणत असतात. मग अशात बाजार बंद असला तर शेतकरी आपल्याकडे येणं बंद होईल.सुरुवातील विंचूर येथे आमवस्येचा प्रयोग करण्यात आला तेथील व्यापाऱ्यांना अधिक फायदा झाला त्यांचे उदाहरण देऊन येथील व्यापाऱांचे मत परिवर्तन करण्यात आले. सुरुवातीला म्हणजेच पहिल्या आमवस्येला जेव्हा लिलाव घेतला तेव्हा एकूण 200 ते 300 ट्रॅक्टर समितीमध्ये आली होती. परंतु साधरण वर्षभरानंतर  या दिवशी 500 ते 600च्या वरती ट्रॅक्टर येत असल्याची माहिती बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने दिली.

Read Also :  अलीगढ ते मालेगावपर्यंत रस्त्यावर उतरल्या मुस्लिम महिला

लासलगाव बाजार समितीमधील कांदा व्यापारी मनोज जैन म्हणतात,  हे युग स्पर्धेचं आहे, यात टिकायचे असेल तर आपल्याला वेळेनुसार बदलावे लागेल. नवीन धोरण स्विकारावे लागतील. यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी  एकमताने या दिवशी इतर सुट्ट्यांमुळे लिलाव बंद करणं टाळलं. कमी सुट्ट्या कशा पडतील आणि अधिक काम कसे चालेल याचा विचार करत आमवस्येचा निर्णय आम्ही घेतला. या दिवशी लिलाव सुरू करण्याचा प्रस्ताव आधी व्यापाऱ्यांनी मांडला तो प्रस्ताव सभापतींपुढे सादर करण्यात आला आणि त्याला मान्यता मिळाली.

सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असल्यानं लासलगाव समितीला जास्तीत जास्त आवक करणं गरजेचं आहे. काही दिवसांमध्ये सोलापूर बाजार समितीनं देशातील सर्व बाजार समितींना मागे टाकलं आहे. लासलगाव बाजार समितीदेखील पिछाडीवर होती. सोलापूर समितीने पंधरा दिवसात चक्क 110 कोटी रुपयांची उलाढाल केली होती. सोलापूर समितीने मुंबई तसेच बंगळुरू सारख्या बाजारपेठांना देखील ओव्हरटेक केले आहे.  बाजार समितीची एका दिवसाची उलाढाल ही साधरण तीन ते चार कोटीची असते. अशात वर्षातील बारा आमवस्येला बाजार बंद ठेवला तर मोठं नुकसान होते. फक्त सुट्ट्यांच्या दिवसांची आकडेवारी पाहिली तर 12 लाख क्किंटल मालाची आवक झाली आहे. एकदंरीत 15 लाख क्किंटलपेक्षा जास्त शेतमालाची आवक झाल्याची माहिती बाजार समितीतील कर्मचाऱ्यांनं दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी