नाशिक : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही आहे. त्यामुळे शिवसेनेतून कोणालातरी मुख्यमंत्री करण्याचे ठरवले जात आहे. परंतु, माझा असला सल्ला आहे की उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र यावे असा सल्ला केंद्रीय सामाजिक कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील भाजप शिवसेनेला दिला आहे.
नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. त्यांनी विविध विषयांवर खास आपल्या शैलीत फटकेबाजी केली.