महाराष्ट्र बोर्ड परीक्षा: परीक्षा पुढे ढकलल्या असल्याची खोटी नोटीस झाली व्हायरल

Maharashtra board exams: महाराष्ट्र वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला एका खोट्या नोटिसमुळे बराच त्रास सहन करावा लागला आहे. या नोटिसीवर वैद्यकीय अधीक्षक आणि विभागप्रमुखांच्या स्वाक्षऱ्याही आहेत.

Exam
महाराष्ट्र बोर्ड परीक्षा: परीक्षा पुढे ढकलल्या असल्याची खोटी नोटिस झाली व्हायरल  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • परीक्षेच्या तारखा जाहीर केल्यानंतर व्हायरल झाली खोटी नोटिस
  • विद्यापीठाने अशी नोटिस काढली नसल्याचा दिला निर्वाळा
  • याआधीही विद्यापीठात झाली होती सदृश्य घटना

Maharashtra board exams, नाशिक: महाराष्ट्र (Maharashtra) वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या (University of Medical Sciences) परीक्षा विभागाला (examination department) एका खोट्या नोटीसमुळे (fake notice) बराच त्रास सहन करावा लागला आहे. सोलापूरच्या डॉ. व्ही. एम. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक (medical superintendent) आणि विभागप्रमुखांच्या (dean) सह्या (signatures) असलेली ही नोटीस आहे. या नोटीशीत म्हटले आहे की वैद्यकीय विज्ञान (medical sciences) शाखेच्या पदवीपूर्व (pre-degree) पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या आगामी परीक्षा (exams) पुढे ढकलल्या (postponed)  गेल्या आहेत. सदर नोटीस सोशल मीडिया मंचांवर (social media platforms) व्हायरल (viral) झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी (students) परीक्षा नियंत्रक (exam controller) अजित पाठक यांच्याशी संपर्क साधला आणि नोटीसीची सत्यासत्यता (authenticity) पडताळून पाहण्यास सांगितले.

परीक्षेच्या तारखा जाहीर केल्यानंतर व्हायरल झाली खोटी नोटीस

एप्रिल 7 रोजी विद्यापीठाने या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यानंतर काही दिवसांनीच ही खोटी नोटीस सामाजिक संपर्क माध्यमांवर व्हायरल झाली आहे. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार सदर परीक्षा ही एप्रिल 19 पासून सुरू होणार आहे आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू राहणार आहेत. व्हायरल झालेल्या खोट्या नोटीसीत म्हटले होते की परीक्षा विभागातील अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आणि इतरांनाही लागण झाली असल्याची शक्यता पाहता विद्यापीठाला ही परीक्षा घेता येणार नाही. अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे आणि परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून तारखा नंतर जाहीर करण्यात येतील असेही यात म्हटले होते.

विद्यापीठाने अशी नोटीस काढली नसल्याचा दिला निर्वाळा

पाठक यांनी याबद्दल बोलताना म्हटले, “मी तातडीने सोलापूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे विभागप्रमुख संजीव ठाकूर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी अशी नोटीस काढली आहे का याची शहानिशा केली. त्यांनी याला नकार दिला आणि आता त्यांनी अशी नोटीस विद्यापीठाने काढली नसल्याबद्दलच्या सूचना जारी केल्या आहेत. तसेच या सूचना अधिकृत संकेतस्थळावरही अपलोड केल्या आहेत.” त्यांनी ठाकूर यांना अज्ञात लोकांविरोधात स्थानिक सायबर पोलीसस्थानकात तक्रार दाखल करण्याच्या सूचनाही दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

याआधीही विद्यापीठात झाली होती सदृश्य घटना

गेल्या वर्षीही असाच एक प्रकार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या निदर्शनास आला होता जेव्हा पदव्युत्तर परीक्षांच्या वेळापत्रकाबाबतचे एक खोटे सर्क्युलर व्हायरल झाले होते. यामागे दिशाभूल करण्याचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या नसून त्यांनी त्यांच्या कारवाईला सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी