कांद्याच्या भावात घसरण,  लासलगावला कांदा लिलाव पाडला बंद 

सततच्या कांद्याच्या भावात घसरण होत आहे. त्यामुळे  महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव हे बंद पाडले.

Fall in onion prices, Lasalgaon onion auction closed
कांद्याच्या भावात घसरण,  लासलगावला कांदा लिलाव पाडला बंद   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सततच्या कांद्याच्या भावात घसरण होत आहे.
  • त्यामुळे  महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव हे बंद पाडले.
  • कांद्याला 30 रुपये किलो भाव द्यावा अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आले.  

लासलगाव :  सततच्या कांद्याच्या भावात घसरण होत आहे. त्यामुळे  महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव हे बंद पाडले. कांद्याला 30 रुपये किलो भाव द्यावा अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आले.  मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे (Fall in onion prices, Lasalgaon onion auction closed)


लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी सकाळच्या सुमारास कांदा लिलाव सुरुवात झाला होता,  मात्र कांद्याबाबत होणाऱ्या घसरणीमुळे महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडला.  कांद्याला 30 रुपये किलो भाव द्यावा अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली. 

सोमवारी कांदा लिलाव सुरुवात झाली मात्र कांद्याला दहा ते बारा रुपये किलो भाव मिळत असल्याने सतत कांद्याच्या भावात होणाऱ्या घसण्यामुळे कांदा लिलावा बंद पाडला असून कांद्याला योग्य तो हमीभाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली इतर राज्यांमध्ये स्थानिक कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने कांद्याचे भावात घसरण होत असल्याची माहिती कांदा व्यापारी यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी