सरणासाठी रचलेल्या लाकडांनी एकमेकांवर हल्ला, श्रद्धांजली वाहायला आलेल्या दोन गटात तुंबळ हाणामारी

नाशिक
विजय तावडे
Updated Dec 29, 2021 | 15:52 IST

Fighting between two political groups in nashik : यानंतर वाद चिघळत गेला आणि दिवे यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी सरणासाठी रचलेल्या लाकडांनी गांगुर्डे यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. दिवे यांच्या गटाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गांगुर्डे गटातील लोकांनी आला जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला

Fighting between two political groups
श्रद्धांजली वाहायला आलेल्या दोन गटात तुंबळ हाणामारी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिवे यांनी गांगुर्डे यांना शोकसभेतून हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याने झाला वाद?
  • सरणासाठी रचलेल्या लाकडांनी गांगुर्डे यांच्यावर हल्ला केला
  • दिवे यांच्या घरातील महिलांनी बॅनर फाडून टाकल्याचा आरोप विक्रांत गांगुर्डे यांनी केला

नाशिक  : राजकीय कारणातून कुरापतीनंतर २ गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर दोन्ही गटांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात जाऊन एकमेकांवर जाऊन तक्रारी दिल्या असून, पोलिसांनी सदर घटनेत परस्पर विरोधी गुन्हे (FIR filed) दाखल केले आहे. राजकीय कारणातून कुरापत काढल्यानंतर दोन गटांनी सरणासाठी रचलेल्या लाकड्याच्या सह्याने एकमेकांना मारहाण केली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांच्या फिर्यादीनुसार गुन्हे दाखल केले आहेत. ज्येष्ठ लोककवी विनायक पाठारे यांच्या अंत्यसंस्कारासाठी (poet vinayak pathare death) अमरधाममध्ये हा प्रकार घडला आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या दोन गटांत तुफान हाणामारी (two group beat each other) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दिवे यांनी गांगुर्डे यांना शोकसभेतून हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याने झाला वाद?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी अमरधाम (Amardham) याठिकाणी नाशिक (Nashik) येथील ज्येष्ठ कवी, गीतकार विनायक पाठारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पाठारे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अंत्यसंस्काराला सर्व क्षेत्रातील मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक राहुल दिवे देखील आपल्या काही कार्यकर्त्यांसह पाठारे यांच्या अंत्यसंस्काराला आले होते. अनिल गांगुर्डे आणि प्रशांत गांगुर्डे आपल्या काही साथीदारांसह उपस्थित होतं. अंत्यसंस्कारानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरु असतानाच अशोक दिवे यांनी अनिल गांगुर्डे यांना शोकसभेतून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. पण गांगुर्डे यांनी श्रद्धांजली सभेतून निघून जाण्यास नकार दिला.

सरणासाठी रचलेल्या लाकडांनी गांगुर्डे यांच्यावर हल्ला केला

यानंतर वाद चिघळत गेला आणि दिवे यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी सरणासाठी रचलेल्या लाकडांनी गांगुर्डे यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती मिळाली आहे. दिवे यांच्या गटाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गांगुर्डे गटातील लोकांनी आला जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला, अशी आम्हिती आणि तक्रार विक्रांत गांगुर्डे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली. या मारहाणीत गांगुर्डे पिता - पुत्र जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दिवे यांच्या घरातील महिलांनी बॅनर फाडून टाकल्याचा आरोप विक्रांत गांगुर्डे यांनी केला

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विक्रांत गांगुर्डे यांचा वाढदिवस होता. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरात लावले होते. पण दिवे यांच्या घरातील महिलांनी हे बॅनर फाडून टाकल्याचा आरोप विक्रांत गांगुर्डे यांनी केला होता. याचं वादाचा वचपा काढत दिवे यांनी गांगुर्डे पिता पुत्रांवर हल्ला केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तर , अनिल गांगुर्डे आणि इतरांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार जयेश सोनवणे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी