Nashik Fire : नाशिकच्या द्वारका परिसरातील कबीरनगरमध्ये चार सिलेंडरचे स्फोट, मोठी आग

नाशिक
रोहन जुवेकर
Updated Aug 06, 2022 | 19:36 IST

Nashik Fire : नाशिक शहरातील द्वारका परिसरात असलेल्या कबीरनगरमधील झोपडपट्टीत चार सिलेंडरचे स्फोट झाले. यामुळे मोठी आग लागली. ही घटना आज (शनिवार ६ ऑगस्ट २०२२) संध्याकाळी घडली.

Fire In Kabir Nagar Slum Area In Nashik City
नाशिकच्या द्वारका परिसरातील कबीरनगरमध्ये चार सिलेंडरचे स्फोट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • नाशिकच्या द्वारका परिसरातील कबीरनगरमध्ये चार सिलेंडरचे स्फोट, मोठी आग
  • आग लागल्यामुळे ३ जण गंभीर जखमी
  • जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले

Nashik Fire : नाशिक शहरातील द्वारका परिसरात असलेल्या कबीरनगरमधील झोपडपट्टीत चार सिलेंडरचे स्फोट झाले. यामुळे मोठी आग लागली. ही घटना आज (शनिवार ६ ऑगस्ट २०२२) संध्याकाळी घडली. अग्निशमन दलाच्या सर्व केंद्रांना अलर्ट देण्यात आला आहे. अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच १०८ क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

आग लागल्यामुळे ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. आग लागताच आसपासच्या भागातील अनेक रहिवासी खबरदारीचा उपाय म्हणून आपापल्या घरातील एलपीजी सिलेंडर घेऊन रस्त्यालगत बसले आहेत. आगीमुळे नागरिकांची धावाधाव सुरू आहे. खबरदारी म्हणून सारडा सर्कल, वडाळा नाका, द्वारकाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी