Four killed in car accident in Nashik : नाशिक : नाशिकमध्ये कारचा अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. अपघात येवला रोडवरील अनकवाडे शिवारात झाला. कार झाडावर आदळून अपघात झाला.
अपघातात कारमध्ये बसलेल्या पाच पैकी चौघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. मध्यरात्री झालेल्या या अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला.
अजय वानखेडे हा अपघातात गंभीर जखमी झाला. अजयवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले नंतर त्याला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय झाला. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.