केंद्र अन् राज्य सरकारकडून नाशिककरांना खूशखबर, जिल्ह्यातील 72935 नागरिकांना मिळणार हक्काचं घर

नाशिक
भरत जाधव
Updated Jan 08, 2022 | 15:10 IST

नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारच्या (State Government) योजनेतून जिल्ह्यातील तब्बल 72935 नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे.

72935 citizens of the Nashik district will get their home
नाशिक जिल्ह्यातील 72935 नागरिकांना मिळणार घर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2021-22 करिता प्राप्त उद्दिष्ट 18668 ची मंजुरी ‘महा आवास’ अभियान ग्रामीण 2.0 मध्ये देण्यात येईल.
  • समाजातील गरजू व घरापासून वंचित असलेल्या लोकांना ‘महा आवास’ अभियानांतर्गत प्रथम प्राधान्य देऊन त्यांना घरकुल उपलब्ध होणार
  • प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत प्राधान्यक्रम यादीतील 69955 लाभार्थ्यांपैकी 58635 (85.49%) घरकुले पूर्ण

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारच्या (State Government) योजनेतून जिल्ह्यातील तब्बल 72935 नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे. या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीसोबतच कामे अधिक दर्जेदार करावी. त्यासासाठी कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  (Minister of Food, Civil Supplies and Consumer Protection) तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे नाशिक जिल्हा ‘महा आवास’अभियान 2.0 जिल्हास्तरीय कार्यशाळा झाला, त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. 

पालकमंत्री भुजबळ यावेळी म्हणाले की, समाजातील गरजू व घरापासून वंचित असलेल्या लोकांना ‘महा आवास’ अभियानांतर्गत प्रथम प्राधान्य देऊन त्यांना घरकुल उपलब्ध करून द्यावेत. घर बांधण्यासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारत बांधतांना त्यांचा कामाचा दर्जा खालावणार नाही, याकडे संबधित अधिकारी व यंत्रणा यांनी कटाक्षाने व जबाबदारीने लक्ष देणे आवश्यक आहे. शासनाने या उपक्रमासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अधिकाधिक तळागाळातील गरजू घटकांपर्यत घरकुलाचा लाभ पोहचेल, याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे व कामे गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

72935 घरकुले पूर्ण

दरम्यान, या कार्यशाळेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प अधिकारी उज्ज्वला बावके यांनी यावेळी ‘महा आवास’ अभियान ग्रामीण नाशिक जिल्हा बाबत माहिती दिली. बावके म्हणाल्या, सन 2016-17 पासून 20 नोव्हेंबर, 2020 हा दिवस राष्ट्रीय आवास दिन म्हणून साजरा केला जातो. 2020-21 वर्षातील ‘महा आवास’ अभियान-ग्रामीण प्रमाणेच सन 2021-22 वर्षात देखील राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत ‘महा आवास’ अभियान-ग्रामीण 2.0 राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 

सन 2020-21 या वर्षातील ‘महा आवास’ अभियान कालावधीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 5059 व राज्य पुरस्कृत आवास योजनांतर्गत 1775 अशी एकूण 6774 घरकुले नाशिक जिल्ह्यात पूर्ण करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत प्राधान्यक्रम यादीतील 69955 लाभार्थ्यांपैकी 58635 (85.49%) घरकुले पूर्ण झाली आहेत. राज्य पुरस्कृत आवास योजनांमध्ये देखील 19111 घरकुलांपैकी 14300 (75.42%) घरकुले म्हणजेच एकूण 72935 घरकुले पूर्ण झाली आहेत. केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनांतील शिल्लक घरकुले या ‘महा आवास’ अभियान-ग्रामीण 2.0 मध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत.

18668 घरे साकारणार

आवास प्लस (ड यादी) मध्ये 288171 कुटुंबांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी 234476कुटुंब सिस्टीमद्वारे पात्र झालेले आहेत. त्यांची अंतिम प्राधान्यक्रम यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर यादी ग्रामपंचायत निहाय तयार झाल्यावर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2021-22 करिता प्राप्त उद्दिष्ट 18668 ची मंजुरी ‘महा आवास’ अभियान ग्रामीण 2.0 मध्ये देण्यात येईल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी