नाशिक : युवकांमध्ये हृदयविकाराचं (heart disease) प्रमाण खूप वाढलं आहे. बदलत्या जीवनशैली (Lifestyle) तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढले आहे. चुकीच्या आहारामुळे (diet) तरुण वयात हर्ट अॅटक (Heart attack) येत मृत्यू होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगावात अशीच एक घटना घडली आहे. (Heart Attack occurred while swimming in the swimming pool; Death of 19-year-old youth)
स्विमिंग पूलमध्ये (swimming pool) पोहत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने एका 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मालेगावमध्ये घडली आहे. ही घटना 28 ऑगस्टच्या दुपारची असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहे. मृत झालेल्या युवकाचे नाव जयेश भावसार आहे. शिवाजी नगर परिसरात असलेल्या अस्पायर क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये जयेश भावसार हा रविवारी नेहमीप्रमाणे पोहोण्यासाठी आला होता. मात्र यावेळी पोहत असतानाच त्याला त्रास जाणवला आणि तो स्विमिंग पुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. हे बघताच इथं उपस्थित असलेल्या काही तरुणांनी त्याला बाहेर काढून छाती आणि पोट दाबत वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.
Read Also : PM Kisan Yojanaच्या लाभार्थ्यांसाठी आजचा दिवस आहे महत्त्वाचा
मागील आठवड्यातच नाशिकच्या इंदिरानगर येथील बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ हुदलीकर यांचा हिमाचल प्रदेशात ट्रेकिंगसाठी गेले असता हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. तसेच मागील आठवड्यातच परभणीच्या सचिन तापडिया यांचा बॅडमिंटन खेळून बसल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं तर करण पवार या 20 वर्षीय मुलाचं देखील पोलीस भरतीदरम्यान धावताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले होते.
Read Also : IND vs HK: हाँगकाँगविरुद्ध सामन्यात पंतला संधी?
सध्या अनेकजण शरीर सुदृढ राहावे, यासाठी जिमला जाणे, धावणे, वेगवेगळे खेळ खेळणे, सायकलिंग, ट्रेकिंग अशा अॅक्टिव्हिटी करत असतात. हे चांगले ही आहे मात्र हे करताना तुम्ही तुमच्या हृदयाची, शरीराची क्षमता जाऊन घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण तुम्हाला हृदयाचा त्रास असेल किंवा कुटुंबातील कुणाला हा आजार असेल, अनुवंशिकतेने आलेला हा आजार असेल, अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला न घेता तुमच्या हृदयाच्या,शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केला अथवा शरीराला ताण दिला तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.