नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलं पैशांचं घबाड; आयकर विभागाने जप्त केली २५ कोटी

नाशिक
भरत जाधव
Updated Oct 24, 2021 | 09:32 IST

नाशिक जिल्ह्यात आयकर विभागाने मागील दोन दिवसांपासून १० ते १५ कांदा व्यापाऱ्यांच्या मालमत्तेची झडती घेतली.

Income Tax Department Raids In Nashik
नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलं पैशांचं घबाड  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई.
  • कांदा आणि द्राक्ष व्यापाऱ्यांकडे सापडले घबाड.
  • मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने केलेली कारवाई महत्त्वाची ठरते. 

नाशिक: नाशिक जिल्ह्यात आयकर विभागाने  मागील दोन दिवसांपासून  १० ते १५ कांदा व्यापाऱ्यांच्या मालमत्तेची झडती घेतली. आयकर विभागाने या झडतीत तब्बल २५ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. अद्याप तपास अजून चालू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आयकर चुकवलेल्या व्यापऱ्यांमध्ये कांदा आणि काही द्राक्ष व्यापाऱ्यांचा समावेश आहे. 

बहुतांश व्यापारी पिंपळगाव बसवंत येथील असून, दोन व्यापारी नाशिक मधील आहेत. सदर व्यापाऱ्यांनी एकूण शंभर कोटी रुपयांचा आयकर चुकवल्याचा आयकर कार्यालयाचा अंदाज असून, त्यातील २५ कोटी रुपये जप्त करून ही रक्कम ' स्टेट बँक ऑफ इंडिया 'च्या शाखेत जमा करण्यात आली आहेत. दरम्यान, आयकर विभागाच्या या कारवाईमुळे कांदा व्यापऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष या करवाईकडे लागले आहे. देशातील कांद्याची मोठी बाजार पेठ म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिकमध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते.

यात कांदा आणि द्राक्ष पिकांचा सर्वात मोठा वाटा असतो. देशभरात येथून मालाचा पुरवठा होतो. यामुळे व्यापारीही येथे मोठ्या संख्येने आहेत. मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने केलेली कारवाई महत्त्वाची ठरते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी