लासलगाव समितीनं अमावास्या शुभ असल्याचं केलं सिद्ध; 8 महिन्यात कांदा लिलावात 250 कोटींची उलाढाल

नाशिक
भरत जाधव
Updated Jan 27, 2022 | 18:34 IST

गेल्या ७५ वर्षांपासून अमावास्येला बंद असलेले लासलगाव बाजार समितीचे (Lasalgaon Market Committee) कांदा लिलाव हे रूढी, परंपरा याला फाटा देत सुरू करण्यात आल्याने जून (June) महिन्यापासून कांदा लिलावाच्या (Onion auction) उलाढालीत 250 कोटींची वाढ झाली आहे.

Lasalgaon committee  Onion auction turnover of Rs 250 crore
लासलगाव समितीला अमावास्या पावली  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • लासलगाव समितीला अमावास्या पावली
  • अमावास्या व शनिवारी कांदा लिलाव सुरू केले असल्याने बाजार समितीत १२ लाख क्विंटल कांदा आवक वाढली.
  • शेतकऱ्यांची कांदा विक्रीची गरज लक्षात घेऊन लासलगाव बाजार समितीने ही परंपरा मोडीत काढली.

नाशिक : गेल्या ७५ वर्षांपासून अमावास्येला बंद असलेले लासलगाव बाजार समितीचे (Lasalgaon Market Committee) कांदा लिलाव हे रूढी, परंपरा याला फाटा देत सुरू करण्यात आल्याने जून (June) महिन्यापासून कांदा लिलावाच्या (Onion auction) उलाढालीत 250 कोटींची वाढ झाली आहे. लासलगाव बाजार समितीच्या प्रथम महिला सभापती सुवर्णा जगताप (Women Speaker Suvarna Jagtap) यांनी व्यापारी वर्गाशी समन्वय साधत, अमावास्या व शनिवारी कांदा लिलाव सुरू केले असल्याने बाजार समितीत १२ लाख क्विंटल कांदा आवक वाढली आहे. 

लासलगाव बाजार समिती ची स्थापना ही एक एप्रिल 1947 झाली आहे. तेव्हापासून ते आजतागायत म्हणजेच गेल्या 75 वर्षाच्या कालखंडापासून लासलगाव बाजार समितीमध्ये अमावस्याला कांदा तसेच भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव बंद असायचे. परंतु शेतकऱ्यांची कांदा विक्रीची गरज लक्षात घेऊन लासलगाव बाजार समितीने ही परंपरा मोडीत काढत अमावस्या पासून प्रत्येक अमावस्येला सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव सुरू केलेले आहेत. कांदा लिलाव हे सुरू झाल्याने बाजार समितीत गेल्या आठ महिन्यांमध्ये 250 कोटींची उलाढाल झाली आहे.

लासलगाव हे कांद्याच्या बाजारपेठेत आशिया खंडात प्रसिद्ध आहे. त्यातील कांद्याचे दर हे लासलगाव बाजार समिती वरून निश्चित केले जातात. या महत्त्वाच्या बाजार समितीने 10 जून 2021 पासून लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन कांदा लिलाव सुरू केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी