छगन भुजबळांनी शिवसेनेला दिली 'ही' खुली ऑफर, शिवसेना स्विकारणार का ऑफर?

नाशिक
पूजा विचारे
Updated Oct 25, 2019 | 08:26 IST

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर आता युतीची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे.

Changan Bhujbal and uddhav thackeray
छगन भुजबळांनी शिवसेनेला दिली 'ही' खुली ऑफर, शिवसेना स्विकारणार का ऑफर? 

थोडं पण कामाचं

  • राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाले.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर आता युतीची चर्चा रंगू लागली आहे.
  • निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं.
  •  आता मुख्यमंत्रीपदासाठी युतीत रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र दिसतंय.

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर आता युतीची चर्चा रंगू लागली आहे. निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. पण आता खरी लढत सुरू झाली आहे ती मुख्यमंत्रीपदासाठी.  आता मुख्यमंत्रीपदासाठी युतीत रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन आपआपली मतं व्यक्त केली. एकीकडे उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येक वेळी भाजपची अडचण समजून घेणार नाही तर दुसरीकडे महायुतीतचंच सरकार होईल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली आहे. 

भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपद घेणार का आमच्यासोबत येऊन मुख्यमंत्रीपद घेणार असं म्हणत भुजबळांनी शिवसेनेला खुली ऑफर दिली. भुजबळांच्या या वक्तव्यावरून असं स्पष्ट होतं आहे की, मुख्यमंत्रीपद हवं असल्यास आमच्यासोबत या असंच भुजबळांचं म्हणणं आहे. एवढ्याच भुजबळ थांबले नाही तर ते पुढे म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकतं. शिवसेना भाजपसोबत राहूनही मुख्यमंत्रीपद घेऊ शकते. पण ते आता शिवसेनेनं ठरवायचं आहे, असंही भुजबळांनी पत्रकारांना सांगितलं. 

विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघातून छगन भुजबळांनी निवडणूक लढवली होती. चौथ्यांदा भुजबळांचा विजय झाला आहे. तीन वेळा येवला मतदारसंघाचे नेतृत्त्व करणारे छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा मतदारांनी विश्वास दाखवला आणि त्यांना चौथ्यांदा विधानसभेत पाठवले. भुजबळांनी महायुतीच्या संभाजी पवारांचा पराभव केला आहे. भुजबळ तब्बल ५० हजारांच्या मताधिक्क्यानं विजयी झालेत. अनेकांनी भुजबळांना ही निवडणूक कठीण असल्याचं अंदाज वर्तवला होता. तीन वाजेपर्यंत येथे १७ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली होती. त्यात भुजबळांना ४१ हजार ४०१ मतांचं मताधिक्य मिळालं होतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी