सलग नऊ वेळा खासदार झालेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

नाशिक
रोहन जुवेकर
Updated Sep 17, 2022 | 11:52 IST

Maharashtra Nandurbar Former Congress MP Ex Union Minister Manikrao Gavit passed away : सलग नऊ वेळा खासदार झालेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

Maharashtra Nandurbar Former Congress MP Ex Union Minister Manikrao Gavit passed away
माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सलग नऊ वेळा खासदार झालेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन
  • ८८ वर्षांचे होते माणिकराव गावित
  • अल्पशा आजाराने निधन

Maharashtra Nandurbar Former Congress MP Ex Union Minister Manikrao Gavit passed away : सलग नऊ वेळा खासदार झालेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नाशिकमध्ये खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८८ वर्षांचे होते. 

माणिकराव गावित नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. कार्यकर्ते माणिकराव गावित यांना दादासाहेब या नावाने ओळखत होते. त्यांचे आज (शनिवार) सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त माणिकरावांचे पुत्र भरत गावित यांनी ट्वीट करून दिले. 

मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी सीएम शिंदेंच्या विविध घोषणा; मुख्यमंत्री मराठवाड्याचा बॅकलॉक काढणार भरुन

माणिकरावांनी १९६५ मध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. नंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री अशी पदं न मागताच त्यांना मिळत गेली. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले.  माणिकरावांनी १९८१ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. नंतर त्यांनी सलग नऊ वेळा लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला. पण २०१४च्या मोदी लाटेत पहिल्यांदाच माणिकरावांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. नंतर २०१९ मध्ये त्यांचे सुपुत्र भरत गावित यांनी उमेदवारी मागितली. पण काँग्रेसने के. सी. पाडवी यांना तिकीट दिले. याचे परिणाम लगेच दिसून आले. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भरत गावित यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर कन्या निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

Amit Shah: 'ठंडे दिमाग से किया जाता है वह..', शेलारांनी सांगितला अमित शाहांचा भन्नाट किस्सा

माणिकराव सलग दहाव्यांदा लोकसभेवर खासदार म्हणून गेले असते तर हा एक विक्रम झाला असता. पण हा विक्रम मोदी लाटेत हुकला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावितांना श्रद्धांजली

'आदिवासी, ग्रामीण भागाचा सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून देशभर लौकिक असलेले प्रगल्भ असे मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या निधनाचे वृत्त कळताच श्रद्धांजली अर्पण केली.

'ज्येष्ठ नेते गावित यांचा ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्यमंत्री ही वाटचाल त्यांच्या नेतृत्वाविषयी खूप काही सांगून जाते. त्यांनी निवडणुकीतील मताधिक्याने आपल्या लोकप्रियतेची ओळख करून दिली. आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करतो त्या आदिवासी, ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्यासाठीच्या विकास प्रकल्प, योजना यांसाठी ते हिरीरीने प्रयत्नशील असतं. त्यांच्या सारखे मार्गदर्शक नेतृत्व गमावणे हे राजकीय क्षेत्राची हानी आहे. ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांना भावपूर्ण श्रद्धांजली' असेही मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी