नाशिक : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rain in Maharashtra) पडत आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. मात्र, या मुसळधार पावसामुळे राज्यातील विविध ठिकाणी दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नाशिक जिल्ह्यात (Nashik district) सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या (Godavari river) पाणी पात्रात मोठी वाढ झाली आहे. यामुळे नदी काठची मंदिरे पाण्याखाली गेल्याचं पहायला मिळत आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने दुपारी २ वाजता धरणातून १०००० क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तर दुपारी १ वाजता गंगापूर धरणातून ५५०० क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
#WATCH | Maharashtra: Various temples submerge under the Godavari river in Nashik, due to incessant rain for the past three days pic.twitter.com/AvAr7JYoYE — ANI (@ANI) July 11, 2022
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू अशल्याने गोदावरी नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नाशिक शहरातील गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे अशा सूचना नागरिकांना प्रशासनाने दिल्या आहेत.
हे पण वाचा : मुंबई: खेळता-खेळता चिमुकला ११व्या मजल्यावरुन खाली कोसळला
हवामान विभागाने ११ जुलै ते १४ जुलै या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थआपन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.
राज्यात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. त्यातच आता राज्यातील १६ जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
रेड अलर्ट - यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली
ऑरेंज अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपगनर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम