Nashik Schools Closed till Jan 31 : नाशिक : महाराष्ट्र (Maharashtra) आणि देशाच्या इतर भागांमध्ये कोरोनाची तिसरी लाटने (Corona Third Wave) हाहाकार मजवला आहे. राज्यासह देशातील इतर भागात झपाट्याने कोरोनाची प्रकरणे (Corona cases) वाढत आहेत, यामुळे नाशिक प्रशासनाने (Nashik Administration) जिल्ह्यातील (District) ऑफलाइन वर्ग (Offline class) 10 जानेवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात नाशिक जिल्ह्यातील 10वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वगळता सर्व शाळा 10 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील. वाढत्या रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्रात आतापर्यंत मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी वाढत्या प्रकरणांबाबत इशारा देताना गुरुवारी ही घोषणा केली. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांनी परिस्थितीचा आढावा बैठक घेतली. या आयोजित आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी नागरिकांना दक्षता घेण्याचा आणि लस घेण्याचा सल्ला दिला. दोन्ही लस घेतले नसल्यास नागरिकांना रेशन दिले जाणार नसल्याचे घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. पात्र असलेल्या सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत तर रेशन दिले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी मुंबई आणि पुण्यातील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी महाराष्ट्र अकृषी विद्यापीठाची महाविद्यालयेही 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ऑनलाइन मोडवर स्विच करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इयत्ता 10वी आणि 12वीचे ऑफलाइन वर्ग सध्या सुरू राहतील.
15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनाही लसीकरणासाठी शाळेत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहवालानुसार, राज्यातील आगामी बोर्डाच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. शिक्षण विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आवश्यकतेनुसार परीक्षांबाबत संबंधित निर्णय घेतला जाणार आहे.