Shocking incident happened in Maharashtra : पतीच्या मृत्यूनंतर नणदेने गळ्यात चपलांचा हार घालून वहिनीची गावातून काढली धिंड

नाशिक
रोहन जुवेकर
Updated Feb 01, 2023 | 11:26 IST

Maharashtra Woman Beaten, Paraded With Garland Of Shoes For Questioning Husband's Death : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या  शिवरे गावात धक्कादायक घटना घडली.

Maharashtra Woman Beaten, Paraded With Garland Of Shoes For Questioning Husband's Death
पतीच्या मृत्यूनंतर नणदेने गळ्यात चपलांचा हार घालून वहिनीची गावातून काढली धिंड  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पतीच्या मृत्यूनंतर नणदेने गळ्यात चपलांचा हार घालून वहिनीची गावातून काढली धिंड
  • महिलेने पोलिसांकडे केली तक्रार
  • पोलीस तपास सुरू

Maharashtra Woman Beaten, Paraded With Garland Of Shoes For Questioning Husband's Death : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या  शिवरे गावात धक्कादायक घटना घडली. एका महिलेने तिच्या पतीच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित केली. महिलेचे प्रश्न ऐकून संतापलेल्या तिच्या नणदेने धक्कादायक कृती केली. नणदेने वहिनीच्या तोंडाला काळे फासले. यानंतर नणदेने वहिनीच्या गळ्यात चपलांचा हार घातला आणि तिची गावातून धिंड काढली. याआधी पतीच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित करणाऱ्या महिलेला घरातल्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने बेदम मारहाण केली. 

पीडित महिलेच्या पतीचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. पण ही घटना घडली त्यावेळी महिला तिच्या सासुरवाडीतील घरी नव्हती तर बाहेर गेली होती. पतीच्या निधनाची माहिती मिळताच संबंधित महिला तातडीने सासुरवाडीतल्या घरी परतली. घरी परतल्यावर मनात काही प्रश्न निर्माण झाल्यामुळे महिलेने चौकशी सुरू केली. महिलेचे प्रश्न ऐकून संतापलेल्या नणदेने स्वतःच्या वहिनीच्या बाबतीत धक्कादायक कृत्य केले. 

महिलेने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी अपघात झाल्यामुळे ती विश्रांती घेण्यासाठी माहेरी गेली होती. महिला माहेरी असताना तिच्या पतीचा मृत्यू झाला. महिलेच्या पतीने आत्महत्या करून स्वतःचे आयुष्य संपवले. अचानक आपल्या पतीने आत्महत्या करण्यासारखे काय घडले असा प्रश्न सतावू लागल्यामुळे महिलेने घरी परतल्यावर पतीच्या मृत्यूची तिच्या पद्धतीने चौकशी सुरू केली. 

महिलेच्या वर्तनाचा राग आल्यामुळे संतापलेल्या नणदेने स्वतःच्या वहिनीला अतिशय धक्कादायक वागणूक दिली. महिलेने कसेबसे स्वतःला वाचवले आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. महिलेच्या तक्रारीचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये ED ची मोठी कारवाई; धाड चालू असतानाच बँकेच्या माजी अध्यक्षाने नष्ट केला पुरावा

Pune murder Mystry: एकाच कुटुंबातील 7 जणांच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं, नेमकं काय घडलं? वाचा INSIDE STORY

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी