Malegaon : आगाऊपणाचा किडा; स्टंटबाजी करता पुरात उडी, मग कुठेच सापडेना गडी; VIDEO व्हायरल

नाशिक
भरत जाधव
Updated Jul 14, 2022 | 16:07 IST

राज्यात दमदार पाऊस चालू असून बहुतेक नद्यांना पूर आला आहे. सर्वत्र नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांनी तर धोक्याची पातळी ओलांडल्या आहेत. जिवीतहानी होऊ नये, म्हणून प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहेत, तरीही काही बहाद्दर आपला आगाऊपणा करताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एका तरुणाचा स्टंटबाजी करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jump into the flood while doing stunts, then find no where to fall
गिरणा नदीत स्टंटबाजी, पुरात घेतली उडी मग कुठेच सापडेना गडी  |  फोटो सौजन्य: Times Now

नाशिक : राज्यात दमदार पाऊस चालू असून बहुतेक नद्यांना पूर आला आहे. सर्वत्र नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांनी तर धोक्याची पातळी ओलांडल्या आहेत. जिवीतहानी होऊ नये, म्हणून प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहेत, तरीही काही बहाद्दर आपला आगाऊपणा करताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एका तरुणाचा स्टंटबाजी करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या तरुणाने केलेलं धाडस त्याला महागात पडलं आहे. मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीला पूर आला असून या पाण्यात या पठ्ठ्यानं  उडी मारली. त्यानंतर हा तरुण कुठेच दिसला नाही, अद्याप तरुणाचा शोध लागला नसल्याची माहिती मिळाली आहे. नईम अमीन असं या तरुणाचं नाव असून त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्याचा अद्याप कुठेही शोध लागला नाही. रात्रीपर्यंत शोध सुरू होता पण अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली. व्हिडिओ मध्ये तरुण फक्त उडी मारताना दिसतोय पण पाण्यात पडल्यानंतर कुठेच दिसत नाहीये. 

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, पाण्याच्या ठिकाणांपासून लांब रहा, अशा वारंवार सूचना दिल्या जात असताना आताची तरुणाई अशा प्रकारे धाडस दाखवत आहे. पण यामुळे जीवाला धोका आहे, ही बाब लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी