Malegaon riots: मालेगावाची दंगल पूर्वनियोजित; पक्षाला वाचवण्यासाठी NCPच्या नेत्यांनी शहराला टार्गेट केलं- संशयित आरोपी नगरसेवक

नाशिक
भरत जाधव
Updated Dec 15, 2021 | 16:16 IST

Malegaon riots Tripura Violence : मालेगाव (Malegaon) दंगलीतील संशयित (Suspect) आरोपी (Accused) नगरसेवक (Corporator) मुस्तकिम डिग्निटी (Mustakim Dignity) अखेर पोलिसांना (Police) शरण आला आहे. पोलिसांना शरण येण्यापूर्वी त्याने पत्रकार परिषद (Press conference) घेऊन पोलिसांवर आरोपांच्या  केले आहेत.

Malegaon riots pre-planned -suspected corporator
मालेगावाची दंगल पूर्वनियोजित  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • मालेगावातील घटना घडल्यानंतर डिग्निटी महिनाभर फरार होता.
  • पत्रकार परिषद संपल्यानंतर डिग्निटी दुचाकीसह शहरातून पोलिस ठाण्यात हजर झाला.
  • त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात मालेगाव आणि अमरावतीमध्ये नोव्हेंबर महिन्यात दंगली उसळल्या.

Malegaon riots Tripura Violence : नाशिकः मालेगाव (Malegaon) दंगलीतील संशयित (Suspect) आरोपी (Accused) नगरसेवक (Corporator) मुस्तकिम डिग्निटी (Mustakim Dignity) अखेर पोलिसांना (Police) शरण आला आहे. पोलिसांना शरण येण्यापूर्वी त्याने पत्रकार परिषद (Press conference) घेऊन पोलिसांवर आरोपांच्या  केले आहेत.  पक्षाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) नेत्यांनी शहराला टार्गेट केले, असा आरोपही त्याने केला. दरम्यान महिनाभर संशयित आरोपी फरार होता शहरात येताबरोबर त्याने पत्रकार परिषद घेतली. पण पोलिसांना याचा साधा सुगावा लागला नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.  दरम्यान, घरातील पत्रकार परिषद संपल्यानंतर डिग्निटी दुचाकीसह शहरातून पोलिस ठाण्यात हजर झाला. डिग्निटी हा दिवंगत माजी मंत्री निहार अहमद यांचा जावई आहे. 

पोलिसांवर दबाव

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नावे येऊ नयेत म्हणून पोलिसांवर दबाव होता. स्वातंत्र्यानंतर भारतात राहिलेले मुस्लीम हे जिना नव्हे तर गांधी आणि आंबेडकरांना नेते मानतात. आम्हीही त्यांनाच नेते मानतो. माझा कायद्यावर पूर्ण विश्वास असून, यातून मी सहज सुटेन, असा दावा त्याने केला. 

महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आणला होता

मालेगावातील घटना घडल्यानंतर डिग्निटी महिनाभर फरार होता. त्यानंतर त्याची पत्नी आणि मालेगाव महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शान-ए-हिंद यांनी अचानक त्यांच्या घरी एक पत्रकार परिषद बोलावली. यावेळी डिग्निटी समोर आला. त्याने मालेगावातली दंगल एक पूर्वनियोजित कट होता, असा आरोप केला. महापालिकेतील भ्रष्ट कामांची कोट्यवधींची बिलांची तक्रार केल्यामुळे मला फ्रेम करण्यात आलं. त्यामुळे मालेगावातील हिंसाचारात आपल्यावर हल्ला करण्याचा कट होता, असा आरोपही डिग्निटीनं केला आहे.  याप्रकरणी एमआयएम, जनता दल यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र, बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. त्यांचा फिर्यादीत त्यांचा कसा काय उल्लेख नाही, असा सवालही त्याने केला.

मालेगावमध्ये झालेला हिंसाचार सुनियोजित?

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात मालेगाव आणि अमरावतीमध्ये नोव्हेंबर महिन्यात दंगली उसळल्या. त्यात मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे आले. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे.

तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड करण्यात आली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या असून, इतर 42 जणांवर कारवाई केली आहे. दंगलीच्या सूत्रधाराचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. मालेगाव दंगली प्रकरणी, अजूनही 16 जण फरार आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी