मुंबई : नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) मालेगाव (Malegaon) शहरातील युवक कुत्ता गोळीच्या (dog pill) नशेच्या विळख्यात अडकू लागला आहे. काही दिवसापूर्वी आग्रा महामार्गावर अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता या गोळ्यांचा मोठा साठा सापडला. हजारो रुपयांचा कुत्ता गोळीचा साठा सापडल्याने खळबळ उडाली असून नशेसाठी वापर केली जाणारी कुत्ता गोळी शहरात येतेच कशी याबाबतचा कसून तपास केल्यावर देशातील दोन राज्यांचं कनेक्शन असल्याचा प्रशासनाला संशय आहे. (Malegaon youths are intoxicated with dog pills, police are keeping an eye on drug dealers)
अधिक वाचा : आव्हाडांचा राजीनामा स्वीकारणार का?, राहुल नार्वेकर म्हणाले.
मालेगावी झालेल्या कारवाईनंतर पोलिसांनी तपास केला असता मध्य प्रदेश, गुजरात तसेच भिवंडी परिसरातून या गोळ्या आणल्या जातात. काहीजणांनी हरियाणामधूनदेखील गोळ्या आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात कुत्ता गोलीची सर्वात जास्त विक्री मालेगावमध्ये होत असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या गोळीला पायबंद घालण्यासाठी मालेगाव शहरातील औषध विक्रेत्यांवर आता पोलिसांची नजर असणार आहे.
अधिक वाचा : पेरूच्या पानांचे विविध आजारांवरील अद्भूत फायदे...व्हाल थक्क
मालेगावमध्ये कुत्ता गोळीचे ठिकठिकाणी एजंट असून हे एजंट मध्यप्रदेश आणि गुजरातमधून या गोळअया मिळवत असतात. कुत्ता गोळीचे हब म्हणून मालेगाव शहराची ओळख बनत चालली आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये कुत्ता गोळीची नशा करणारी तरुणाई मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे, त्याबाबत पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई देखील केली जात आहे. परंतु या गोलीचा रॅकेट पूर्णत: बाहेर येत नाहीये. दारू पिण्यासाठी जास्त पैसे लागतात याउलट कुत्ता गोली ही अवघ्या दोन-तीन रुपयांना मिळते. मालेगाव मधील 18 ते 30 वर्ष वयोगटातील बहुतांश तरुणाई या नशेच्या आहारी गेली असून अनेक तरुणांना या गोळीचे व्यसन लागले आहे.
अधिक वाचा : सरकारमधील वाचाळवीरांना अजितदादांनी खडसावले
या गोळीचे नाव अल्प्रलोजोम आहे. काही उत्तेजक पदार्थांपासून गोळीची निर्मिती होते. मानसिक आजार व झोप ने येणे या रुग्नांसाठी अल्प्रालोझम ही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं अल्प प्रमाणात देण्यात येते. मात्र या गोळीचा वापर नशेसाठी वापर होत आहे. या गोळीच्या अतिसेवनाने शरीर बधीर होते. याशिवाय मानसिक संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे. मेंदूवर परिणाम करणाऱ्या या गोळ्यांच्या सेवनाने नशेखोर व्यक्ती आपल्याच धुंदीत राहतो. आपण काय करतोय, याचं भानही या गुन्हेगारांना नशेच्या भरात राहत नाही. या गोळीत उत्तेजक पदार्थ असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीसाठी मनाई आहे. मात्र काही स्टोअर्स या गोळ्या सर्रासपणे मिळतात.
मालेगावच्या नूर हॉस्पिटल भागात कुत्ता गोळी व नशेच्या औषध विक्री केली जात होती. नशेचे औषध विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तेथे कारवाई केली होती. त्यावेळी पोलिासांनी दोन जणांकडून 1 लाख 71 हजार रुपायांची कुत्ता गोळी व नशेची औषधे जप्त केली होती.