''तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलवलंय'', असं सांगत गाडीत बसवलं; नंतर लॉजवर नेऊन केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिक
भरत जाधव
Updated Oct 10, 2021 | 16:02 IST

नाशिकमध्ये पुन्हा एकदा विनयभंगाची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला बळजबरीनं लॉजवर नेऊन विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे.

minor girl Molestation in Nashik
खोटं बोलून लॉजवर नेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग  |  फोटो सौजन्य: BCCL

नाशिक : नाशिकमध्ये पुन्हा एकदा विनयभंगाची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला बळजबरीनं लॉजवर नेऊन विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी नाशिकच्या अशोका मार्ग परिसरातली ही घटना आहे.

दरम्यान या प्रकणातील आरोपी दानिश खान विरोधात काल संध्याकाळी मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिडीत मुलीच्या कुटुंबियांचा ओळखीतील व्यक्ती असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत जाणाऱ्या मुलीला तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलावलं असं सांगून आरोपीने कारमध्ये बसवले. मुलगी कारमध्ये बसल्यानंतर आरोपीने कार लॉजवर नेली आणि तिथे तिच्यावर अतिप्रसंग केला. पीडित मुलीने घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर ही  घटना उघडकीस आली. संतापलेल्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आरोपी दानिश खानला मारहाण केली आहे. सध्या आरोपी दानिशवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी