Nashik Crime: नाशकात उद्योजकाच्या 12 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि सुटका, नेमकं घडलं तरी काय? वाचा सविस्तर

नाशिक
Updated Jan 06, 2023 | 19:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

नाशकातल्या एका उद्योजकाच्या मुलाचं काल अपहरण झालं होतं. सगळे चिंतेत असतानाच...झालं असं..

Nashik businessman's 12-year-old son kidnapped; Nashik news: Nashik police are searching for the youngster's kidnapper
Nashik Crime: नाशकात उद्योजकाच्या 12 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि सुटका, नेमकं घडलं तरी काय? वाचा 
थोडं पण कामाचं
  • नाशिकमध्ये 12 वर्षीय चिमुकल्याचं दिवसाढवळ्या अपहरण
  • अपहरणकर्त्यांनी काही तासांतच केली चिमुकल्याची सुटका
  • नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ

Nashik businessman's 12-year-old son kidnapped : नाशिक : दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांचा मदारी चित्रपट असो किंवा अभिनेता अमिताभ बच्चनचा Te3n असो! बॉलिवूडला थ्रिलर चित्रपट आणि बॉलिवूडच्या तमाम चाहत्यांना थ्रिलर चित्रपट पाहायला किती आवडते हे काही नव्याने सांगायला नको. चित्तथरारक चित्रपटांच्या कथानकासारखं काही दैनंदिन आयुष्यात घडलं तर? अशीच काहीशी घटना नाशिकमध्ये घडली आहे. (Nashik businessman's 12-year-old son kidnapped; Nashik news: Nashik police are searching for the youngster's kidnapper)

कसं झालं अपहरण? 

नाशिकमध्ये एका उद्योजकाच्या मुलाचं गुरुवार (5 जानेवारी 2023) अपहरण झालं होतं. तो शाळकरी मुलगा त्याच्या मित्रांसोबत संध्याकाळी सिन्नर परिसरात खेळत होता. मित्रमंडळी खेळात रममाण झालेले असताना अचानक एक गाडी आली आणि त्या गाडीतील अज्ञातांनी एका 12 वर्षीय मुलाला उचलून घेऊन गेले. ओमनीतून आलेली माणस जेव्हा त्याला ओढून घेऊन जात होती, तेव्हा विरोध दर्शवण्यासाठी त्याने आणि त्याच्या मित्रांनी आराडा - ओरडा करून लोकांना गोळा केलं. स्थानिक नागरिक धावत आले पण त्यांनी काही हालचाल करेपर्यंत त्या अज्ञातांनी चिमुकल्याला घेऊन पळ काढला. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या जमावाने त्या धावत्या गाडीवर दगड भिरकावला. काहींनी धावत धावत गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला. पण काहीही उपयोग झाला नाही. अपहरकर्ते मुलाला घेऊन गेले. 

अधिक वाचाः सावध व्हा! 200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी लीक

पोलीसांनी काय केलं?

अपहरण झालेल्या या दुर्दैवी मुलाचं नावं चिराग कलंत्री होतं. सिन्नर नगर परिषदेसमोरून या मुलाचं अपहरण करण्यात आलं. काळ्या रंगाची पॅन्ट, तोंडावर काळ्या रंगाचा मास्क आणि डोक्यावर गुलाबी रंगाची टोपी घातलेले दोन अपहरकर्ते होते. घटनेची माहिती मिळताच अपहरण झालेल्या चिमुकल्याच्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव घेणार तितक्यात त्यांना अपहरकर्त्यांचा फोन आला. अपहरणकर्त्यांनी त्या मुलाच्या आई - वडिलांकडे पैशांची मागणी केली आणि थोड्याच वेळात पुन्हा फोन करणार आहोत, असं सांगून फोन कट केला. 

त्या फोन नंतर भयग्रस्त आई - वडिलांनी पोलीस ठाण्याकडे तात्काळ धाव घेतली. एकाच वेळी अचानक इतके लोक पोलीस ठाण्यात दाखल झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

अधिक वाचाः Paush Purnima : कधी आहे नव्या वर्षातील पहिली पौर्णिमा?

कशी झाली सुटका? 

अपहरण झालेला चिमुकला कुठे असेल, कसा असेल, कोणत्या परिस्थित असेल? असे प्रश्न सर्वांना पडले होते. मात्र रात्रीच्या सुमारास एक गाडी आली आणि त्या गाडीतील अज्ञातांनी चिमुकल्याला रस्त्यावर सोडून तेथून निघून गेली. अपहरण झालेला चिराग सुखरूप असला तरी अनेक प्रश्न अजूनही निरूत्तर राहिले आहेत. चिरागचं अपहरण का करण्यात आलं? चिरागचं अपहरण कोणी केलं होतं? चिरागच्या अपहरकर्त्यांनी त्याला रात्री अचानक आणून का सोडलं?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी