नाशिक : राष्ट्रवादीच्या नेत्या डॉक्टर प्राची पवार (Dr. Prachi Pawar) यांच्यावर अज्ञात लोकांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. प्राची पवार या माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे माजी नेते वसंत पवार यांची कन्या आहे. शिवाय डॉ. प्राची पवार ह्या नाशिकमधील (Nashik) प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ (Ophthalmologists)आहेत. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने गाडीत बसलेल्या डॉ. प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. प्राची पवार यांची स्थिती गंभीर आहे. अद्याप हल्लेखोर फरार असून पोलिसांसमोर हल्लेखोरांना पकडण्याचं आव्हान आहे. (Nashik Crime : Assault on woman leader of NCP)
अधिक वाचा : वैदेहीने आई-वडिलांना झापलं, राजवर्धनला लागतेय हळद
प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी (13 डिसेंबर) सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर प्राची पवार यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राची पवार यांच्यावर हल्ला झाल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवर्धन परिसरात डॉ. प्राची पवार आपल्या फार्म हाऊसवर (Farm House)इनोव्हा या चारचाकीने गेल्या होत्या. यावेळी फार्म हाऊसच्या प्रवेशद्वारावर दुचाकी लावलेली त्यांना दिसली. दुचाकी बाजूला घ्या असं त्यांनी सांगितलं. परंतु याचा राग आल्याने अज्ञात तीन ते चार जणांच्या टोळक्यातील एकाने चालकाच्या सीटवर बसलेल्या प्राची यांच्या हातावर दोन ते तीन ठिकाणी धारदार शस्त्राने वार केले. डॉ. प्राची पवार यांनी तात्काळ गाडीच्या काचा लावताच टोळक्याने घटनास्थळावरुन पळ काढला.
अधिक वाचा : लैंगिक संबंध ठेवताना महिला खोटं का बोलतात?
दरम्यान, हातावर वार केल्यानंतर डॉ. प्राची पवार यांच्या हातातून अतिरक्तस्राव झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या. गाडीत चालक सीटावर बसलेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर गाडीतून खाली उतरत डॉ. प्राची पवार ह्यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून तेथील स्थानिक नागरिक त्यांच्या मदतीला पोहोचले. आणि त्यांनी प्राची यांना नाशिक शहरातील पंडित कॉलनी परिसरातील त्यांच्याच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील पार पडली असून अतिरक्तस्राव झाल्याने त्या बऱ्याच काळ बेशुद्ध देखील होत्या.
ही घटना समजताच नातेवाईक, डॉक्टर्स आणि परिचित मंडळी रुग्णालय परिसरात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. शिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते. या हल्ल्यामगील नक्की कारण आणि आरोपींचा शोध अद्याप लागलेला नसून नाशिक ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.